संतोष देशमुख अन सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासाठी सर्वपक्षीय सर्वधर्मीय नगरकर एकवटणार

शेअर करा

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी आणि इतरांना सहआरोपी करावे यासाठी अहिल्यानगर शहरात 13 एप्रिल रोजी सर्वधर्मीय सर्वजातीय आणि सर्वपक्षीय असा महा जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. 

कोहिनूर मंगल कार्यालयात या संदर्भात बैठक झालेली असून छत्रपती शिवाजी महाराज चौक माळीवाडा येथून हा मोर्चा सकाळी दहा वाजता सुरू होणार असून कापड बाजार नवीपेठ चितळे रोड दिल्लीगेट रेसिडेन्सीअल कॉलेज येथे समाप्त होऊन त्या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. 

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला असून मोर्चाच्या नियोजनासाठी विविध प्रकारच्या समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. 3 एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता सर्व जातीधर्मीय संघटनांची कोहिनूर मंगल कार्यालयात बैठक होणार असून त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना मोर्चाविषयीचे निवेदन देण्यात येणार आहे. 


शेअर करा