बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यानंतर एका महिलेसोबत त्यांचे आक्षेपार्ह फोटो काढून त्यांना बदनाम करण्याचा आरोपींचा कट होता अशी बाब समोर आलेली असून या प्रकरणात ज्या महिलेची चौकशी करण्यात आलेली होती तिचाच मृतदेह कळंब येथील राहत्या घरी आढळून आला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींनी देशमुख यांना बदनाम करण्यासाठी त्यांना मारहाण करतानाचे आणि त्यांच्याशी घृणास्पद कृत्य करतानाचे व्हिडिओ काढायचे आणि ते व्हायरल करायचे त्यानंतर त्यांना धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे घेऊन जात महिलेकडून त्यांच्यावर गंभीर आरोप करायला लावायचे असा एकंदरीत कट होता. मयत महिला ही खाजगी सावकारकीचा व्यवसाय करत असायची त्यातून तिचा आरोपींशी संपर्क आलेला होता.
आरोपी महिला आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी यांची जवळीक असल्याकारणाने असे सर्व कटकारस्थान आरोपींनी रचलेले होते. संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली . आरोपींचे वाहन देखील कळंब मार्गे आलेले होते. सुरुवातीपासून या प्रकरणात कळंबच्या महिलेचे नाव आले होते मात्र मात्र आता त्या महिलेचा मृतदेह तिच्या राहत्या घरात आढळून आल्याने आतापर्यंत आरोपींनी या महिलेचा आधार घेत किती जणांना देशोधडीला लावलंय हे रहस्य बनून राहिलेले आहे. प्राथमिक तपासात महिलेचा खून झाल्याचे समोर आलेले असून या महिलेने यापूर्वीच दोन जणांवर बलात्काराचे गुन्हे नोंदवलेले आहेत. पोलिसांनी मात्र मयत महिलेचा संतोष देशमुख हत्याकांडाशी काही संबंध असल्याचे वृत्त फेटाळलेले आहे.