कळंबच्या ‘ त्या ‘ महिलेची खाजगी सावकारकी अन संतोष देशमुख प्रकरणात देखील झाली होती चौकशी ,  मृतदेह आढळल्याने खळबळ

शेअर करा

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यानंतर त्यांना मारहाण करत  एका महिलेसोबत त्यांचे आक्षेपार्ह फोटो काढून त्यांना बदनाम करण्याचा आरोपींचा कट होता अशी बाब समोर आलेली असून या प्रकरणात ज्या महिलेची चौकशी करण्यात आलेली होती तिचाच मृतदेह कळंब येथील राहत्या घरी आढळून आला आहे.  मयत महिला ही खाजगी सावकारकीचा व्यवसाय करत असायची त्यातून तिचा आरोपींशी संपर्क आलेला होता. 

उपलब्ध माहितीनुसार , मनीषा कारभारी बिडवे असे मयत महिलेचे नाव असून तिच्या कळंब येथील राहत्या घरी तिचा मृतदेह आढळून आला.  पाच-सहा दिवसांपासून ती कुणाच्याही संपर्कात नव्हती मात्र शेजाऱ्यांना तिच्या घरातून वास येऊ लागल्यानंतर याप्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली आणि त्यानंतर तिचा खून झाल्याची बाब समोर आली. 

मयत महिला बीड जिल्ह्यातील आडस गावची रहिवासी असून, तिचं माहेर अंबाजोगाई तालुक्यातील टाकळी मनोहर हे आहे. महिलेच्या मृत्यूबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत. पोलिसांनी या प्रकरणात एक संशयित आरोपी देखील ताब्यात घेतला आहे. एका आरोपीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.  5 ते 6 दिवस  या महिलेचा मृतदेह घरात पडून होता त्यानंतर शेजाऱ्यांना वास यायला लागला. त्यानंतर सर्व प्रकार समोर आला.

संबंधित महिला ही घरात एकटी राहत होती. द्वारका नगरी वसाहतीतील लोकांचा आणि तिचा फारसा संपर्क नव्हता. ती खासगी सावकारकी करायची. काही लोकांचं तिच्या घरी येणंजाणं होतं त्याचबरोबर तिचा खून अनैतिक संबंधातून झाला असावा, अशी चर्चा देखील दबक्या आवाजात सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणात एकाला अटक केली आहे.

धनंजय देशमुख यांनी याप्रकरणी बोलताना ,’ मी वेळोवेळी सांगत आलो आहे केज स्टेशनमध्ये पहिल्या आठ दिवसाचा तपासाचे री इन्वेस्टीगेशन करावं. त्याच्यातलाच हा एक भाग आहे. हत्या केल्यानंतर चुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी एक महिला तयार केली गेली होती. ही आरोपींनी तयार केलेली महिला होती. त्याच्या अगोदर या गोष्टीमुळे कित्येक जण बळी पडले असतील मात्र पोलिसांनी त्याला गांभीर्याने घेतलं नाही.  त्या महिलेचा कुणीतरी खून केल्याची माहिती आली आहे. याला कारणीभूत कोण आहे आता याची जबाबदारी कोण घेईल ? याचा कुठलाही तपास पोलिसांनी केला नाही असे म्हटले आहे. 

पोलिसांनी मात्र या महिलेचा संतोष देशमुख हत्याकांडाची कुठला संबंध असल्याचे फेटाळलेले आहे. आतापर्यंत या महिलेच्या आडून आरोपींनी किती जणांना खोट्या प्रकरणात अडकवलेले आहे ही बाब समोर आली तर पोलिसांच्या देखील अनेक चुकीच्या बाबी समोर येतील त्यामुळे पोलीस सत्य सांगत नसल्याची देखील चर्चा आहे.


शेअर करा