नगर जिल्ह्यात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून सतरा वर्षीय कबड्डीपटू मुलीवर अत्याचार प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. कबड्डीपटू मुलीवर अत्याचार प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिघांना अटक करण्यात आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
अंकुश बबन भेंडेकर ( वय 24 वर्ष ), शिवाजी निवृत्ती वाबळे ( वय 55 वर्ष दोघेही तालुका शेवगाव ) आणि रमेश शिवाजी गांगर्डे ( वय 26 वर्ष राहणार भैरोबाची वाडी तालुका कर्जत ) अशी आरोपींची नावे आहेत.
शिवाजी वाबळे आणि रमेश गांगर्डे हे क्रीडा प्रशिक्षक असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पीडित मुलीच्या मामाने वाकड पोलीस ठाण्यात 26 तारखेला या संदर्भात फिर्याद दिली होती
पीडित मुलगी ही सतरा वर्षीय असून राष्ट्रीय कबड्डीपटू आहे. भोसरी येथील संस्थेत तिने सराव सुरू केलेला होता त्यानंतर 25 फेब्रुवारी रोजी ती घरी आली नाही म्हणून 26 फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर अंकुश भेंडेकर याला अटक करण्यात आली होती त्यानंतर मुलीने तिच्यावर अत्याचार झाल्याचे सांगितले. वाकड पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
आरोपीने तिला कबड्डी स्पर्धेत खेळण्यासाठी परदेशात पाठवील असे सांगत नेवासा येथे नेले आणि तिथे हॉटेलमध्ये जाऊन तिचा वाढदिवस साजरा केला आणि गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. इतर दोन्ही आरोपींचा देखील या सर्व प्रकारात सहभाग आढळून आल्याने त्यांनाही अटक करण्यात आलेली आहे.