लोकप्रतिनिधींच्या कुरापतीवर अजितदादांनी भूमिका स्पष्ट करावी , समाजवादी पक्षाची मागणी

शेअर करा

‘ विधानसभा निवडणुक निकालानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी शहरातील जातीय सलोखा व सौहार्द बिघडेल अशी विवादास्पद भूमिका स्विकारत राजकारण सुरू केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर अजित पवार यांनी पक्षाची भूमिका , ध्येय , धोरणे स्पष्ट करत नगरकरांसमोर आपली भूमिका स्पष्ट करावीत ,’ अशी मागणी समाजवादी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष आबीद हुसेन यांनी केली आहे.

‘ राजकारणात कुणी काय भूमिका घ्यावी हा ज्याचा त्याचा विषय असला तरी त्या निमित्ताने शहराचे वातावरण गढूळ होत असेल तर असल्या गोष्टी समाज खपवून घेणार नाही याची नोंद पक्षाच्या वरिष्ठांनी घ्यावी ,’ असेही आबिद हुसेन यांनी म्हटलेले आहे. 


शेअर करा