‘ तुम्ही शेण खायचे आणि समाजाला वेठीस धरायचे ‘ चित्रा वाघ बरसल्या

शेअर करा

‘ तुम्ही शेण खायचे आणि समाजाला वेठीस धरायचे, लाज तरी थोडी राहु द्या, ज्या ऑडिओ क्लिप समोर आल्या आहे. जे फोटो आले आहे, त्यावर कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही’ अशा शब्दांत भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर सडकून टीका केली.

‘पूजा चव्हाणाचा हत्यारा संजय राठोड आहे आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. बंजारा समाजाला समोर करून आपला बचाव करण्यासाठी हा केविलवाना प्रयत्न आहे. बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहोरादेवी अशा पवित्र ठिकाणी संजय राठोड याने आपल्या पापाची कबुली दिली आहे’ अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.

‘संजय राठोड यांना वाचवण्यासाठी तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये स्पर्धा रंगली आहे. ज्या प्रकार तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये जी एकी दिसली आहे ती भंडारा शासकीय रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणामध्ये दिसली नाही. बलात्काऱ्याला पाठीशी घालण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहे. त्यामुळे महिला सुरक्षेबद्दल बोलू नये, असंही वाघ म्हणाले.

‘तुम्ही शेण खायचे आणि समाजाला वेठीस धरायचे, लाज तरी थोडी राहु द्या, ज्या ऑडिओ क्लिप समोर आल्या आहे. जे फोटो आले आहे, त्यावर कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही. पूजा चव्हाण प्रकरणी पुणे पोलिसांनी थातुरमातुर उत्तर दिले आहे. या प्रकरणात मुख्य संशयित संजय राठोड आहे. त्यांच्याबद्दल कोणतीही चौकशी केली जात नाही, त्यामुळे तो अहवाल आम्हाला मान्य नाही. आम्ही राज्यपाल आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार करणार आहोत ‘, अशी माहितीही वाघ यांनी दिली.

काय आहे प्रकरण ?

मुळची परळीची असलेली 22 वर्षाची पुजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. तिनं सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच पुजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पुजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही. पोलीसांनीही तशी काही माहिती दिलेली नाही.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्याने या प्रकरणातील अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. संजय राठोड आणि त्यांच्या कार्यकर्त्याच्या संभाषणाची ही क्लिप आहे. एका क्लिपमध्ये संजय राठोड हे मलाच जीव द्यावा लागेल असं म्हणताना दिसत आहे. त्यामुळे पूजाच्या आधीच संजय राठोड यांना जीव द्यावासा का वाटलं? याबाबतचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे तसेच ‘ टेस्ट पॉझिटिव्ह आली ‘ असा देखील शब्द आल्याने कोणती टेस्ट ? ही देखील चर्चा आता रंगली आहे तर भाजपने याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे. अर्थात ह्या क्लीपमधील आवाज संजय राठोड यांचा आहे किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही .


शेअर करा