अचानक ३०-३५ महिलांच्या अचानक अंगात येऊ लागल्याने परिसरात खळबळ

शेअर करा

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील एका गावाला भुताने झापाटल्याची अफवा पसरवण्यात आली आहे. या गावातील 30 ते 35 महिलांच्या अंगात एकाच वेळी येत असल्याने गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे. नागरिक देखील या महिलांपासून चार हात लांब राहणेच पसंत करत आहेत तर काही जिज्ञासू मंडळींनी मात्र प्रकरणात आणखीनच रस घेतलेला पहायला मिळतो आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील एका गावाला भुताने झपाटल्याची अफवा पसरवण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवरा गावात हा विचित्र प्रकार घडला आहे. शिवरा गावातील पारधी समाजातील 30 ते 35 महिलांच्या अंगात एकाच वेळी देवी संचारल्याने गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

गावातील अनेक महिला आणि तरुण मुलींच्या अंगात येवू लागलं आहे. या सर्व लोकांना भुतानं झपाटलं आहे, असं स्थानिक मांत्रिकाने सांगितल्याने नागरिक देखील गडबडून गेले आहेत. मांत्रिक अंधश्रद्धेतच्या प्रभावाखाली येऊन भूत उतरण्याच्या नावाखाली संबंधित महिला आणि तरुणींना अमानुष मारहाण करत असल्याची देखील माहिती आहे. पारधी समाजातील कार्यकर्ते मतीन भोसले यांना कळल्यानंतर या घटनेला वाचा फुटली आहे. मतीन भोसले यांनी या घटनेची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिली.

त्यानंतर अंनिसतर्फे डॉ हमीद दाभोलकर, मतीन भोसले यांनी संबंधित लोकांचं समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित लोकांवर याचा काहीही परिणाम झाला नाही. मांत्रिकाच्या सांगण्यावरून या गावातील लोकांनी भूत उतरवण्यासाठी दुसऱ्या दिवशी विठोबा सावंगी हे ठिकाण गाठलं आहे. हे ठिकाण अंगातील भूत उतरवण्यासाठी ओळखलं जातं. एकाच वेळी गावातील 30 ते 35 लोकांच्या अंगात येत असल्याने संबंधित प्रकार पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.

सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित घटनेची माहिती अमरावती ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांना दिली आहे. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी येताना पाहून अंगात येणाऱ्या लोकांनी आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या मांत्रिकाने पळ काढला आहे. या गावात यापूर्वी नरबळी सारखे गंभीर गुन्हे घडले आहेत. त्यामुळे आणखी एका नवीन प्रकारामुळे गावात दहशत पसरली आहे. त्यामुळे संबंधित लोकांवर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी अंनिसच्या हमीद दाभोळकर आणि मतीन भोसले यांनी केली आहे.


शेअर करा