धक्कादायक! ऑक्सिजनच्या जागी रुग्णांच्या शरीरात चढवलं जातंय बिस्लेरीचं पाणी , कुठे चाललाय प्रकार ?

शेअर करा

देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं सगळे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. ११ दिवसांपूर्वी देशात पहिल्यांदा १ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर काल पहिल्यांदा २ लाख नवे रुग्ण आढळून आले. आज देशात २ लाख १७ हजार ३५३ नवे रुग्ण आढळून आले. तर १ हजार १८५ रुग्णांचा मृत्यू झाला. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे देशातील आरोग्य व्यवस्थादेखील व्हेंटिलेटरवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

बिहारची राजधानी पाटण्यात कोरोनामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाटणा शहरातील दुसरं मोठं रुग्णालय असलेल्या एनएमसीएचमध्ये अनेक कोरोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची भावना आहे. रुग्णालयाच्या बाहेर रुग्णवाहिकांची अक्षरश: रांग लागली आहे. वेळेत उपचार मिळत नसल्यानं अनेक रुग्ण रुग्णवाहिकेतच प्राण सोडत आहेत. त्यामुळे नातेवाईक संतापले आहेत. 

रुग्णालयातील परिस्थतीदेखील विदारक आहे. ऑक्सिजन पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्यानं रुग्णांच्या शरीरात बिस्लेरीचं पाणी चढवलं जात आहे. डॉक्टर रुग्णांना तपासण्यासही येत नाहीत. रुग्णालयात बेड न मिळाल्यानं बाहेर वेटिंगवर असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. रुग्णांचे नातेवाईक कित्येक तास बाहेर ताटकळत थांबले आहेत. रुग्णालय प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं अनेकांनी रुग्णांना घेऊन घरची वाट धरली आहे.

रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांनी वापरलेले किट रुग्णालयाच्या बाहेरच फेकून दिले जात आहेत. पीपीई किट उघड्यावर टाकण्यात आल्यानं त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. मंगळवारी आरोग्य मंत्र्यांनी एनएमसीएच रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचवेळी रुग्णवाहिकेत असलेल्या एका रुग्णानं शेवटचा श्वास घेतला. दीड तासांपासून हा रुग्ण तडफडत होता. मात्र त्याला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आलं नाही.


शेअर करा