पुण्यातील राजकीय वर्तुळ हादरले.. महापौरांपाठोपाठ ‘ ह्या ‘ बड्या व्यक्तीला देखील कोरोनाची लागण

शेअर करा

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ काही आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नाहीत.पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना याआधी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता उपमहापौर सरस्वती शेडगे यांच्यासह सहा नगरसेवक यांना कोरोनाची लागण झाल्याने पुण्यातील राजकीय वर्तुळ हादरून गेले असून काही लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक कार्यक्रम कमी केले आहेत तर काहींनी घराबाहेर पडणेच बंद केले आहे.

पुण्यात महापौरांपाठोपाठ आता उपमहापौर सरस्वती शेडगे आणि पालिकेतील विरोधी पक्षनेते यांच्यासह सहा नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय पुण्यातील दोन खासदार, चार आमदार हे होम क्वारंटाईन झाले आहेत. त्यामुळे शहर आणि परिसरातील राजकीय क्षेत्र धास्तावले आहे. तसेच पालिकेच्या तब्बल 200 कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने महापौर मुरलीधर मोहोळ हे अनेक ठिकाणी भेट देत परिस्थितीचा आढावा घेत होते.त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली, “मला ताप आला होता. त्यामुळे मी कोरोना चाचणी केली. त्यानंतर मला कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाले. आता माझी तब्येत ठिक आहे आणि माझ्यावर उपचार सुरु आहेत”, असं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करत सांगितले देखील होते.

सर्वप्रथम राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. ते कोरोनावर मात करुन घरी परतले असून काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. चव्हाणही आता उपचारानंतर सुखरुप घरी परतले आहेत. धनंजय मुंढे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती मात्र आता ते देखील बरे झाले आहेत . कोरोना बरा होतो त्यामुळे एकदम घाबरुन न जाण्याचे आवाहन वेळोवेळी सरकारकडून करण्यात येत आहे तसेच लक्षणे दिसल्यास तपासणीचे देखील सरकारकडून आवाहन करण्यात येत आहे .


शेअर करा