कोरोना वैश्विक महामारी नावालाच..’ इथे ‘ रंगली भाजप आमदाराची टुबर्ग पार्टी : पहा व्हिडीओ

शेअर करा

आपल्याला प्रश्न विचारले तर आपणच उलट प्रश्न विचारायची सवय असलेल्या भाजपच्या नेत्यांना कोरोनाचे गांभीर्य अजूनही लक्षात आलेले दिसत नाही. एकीकडे बेरोजगारीमुळे होणारी उपासमार तर दुसरीकडे पोलिसांचा मार अथवा दंड यांनी नागरिक वैतागले आहेत तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांच्या पार्ट्यांना उधाण आलेले आहे. अशाच एका भाजपच्या गोव्याच्या आमदाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे .

रविवारी सायंकाळी व्हायरल झालेल्या एक ह्या व्हिडिओमध्ये बार्देस तालुक्यातील हळदोणा मतदारसंघाचे आमदार ग्लेन टिकलो तसेच भाजप उत्तर गोवा जिल्हा उपाध्यक्ष फ्रँकी कार्व्हालो हे ‘मद्य पार्टीत’ सहभागी झालेले दिसले. कोरोनाच्या काळात अशाप्रकारे गोव्यात सत्तेत असलेल्या भाजपने पार्टी आयोजन केल्याने नागरिकांनी त्यांचा सोशल मीडियावर चांगलाच समाचार घेतला आहे . संबंधितांकडून मार्गदर्शक तत्वांना हरताळ फासण्यात आला.

२१ सेकंदाच्या व्हिडिओत हळदोणाचे आमदार ग्लेन टिकलो यांचे आगमन होताना दिसते. यावेळी एक व्यक्ति त्यांचे आगमन झाल्याचे सांगतो. टिकलो यांनी मास्क परिधान केलेले असते, मात्र ते त्यांच्या हनुवटीवर आहे. ती समालोचन करणारी व्यक्ति म्हणते की, ‘स्पेशल गेस्ट इन दी हाऊस… फॉर दी स्पेशल पार्टी…लॉकडाऊन पार्टी…’यावेळी मेजवर बिअरच्या बाटल्या असून हा २९ सेंकदचा व्हिडिओ आहे.

आणखी एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला असून म्हापसा नगरपालिकेचे नगरसेवक फ्रँकी कार्व्हालो हे बॉलिवूडच्या नव्वदच्या दशकातील एका प्रसिद्ध डिस्को गाण्यावर थिरकताना दिसले. ‘आय एम अ डिस्को डान्सअर’ असे या गाण्याचे बोल असून फ्रँकी हे टी-शर्टमध्ये गाण्यावर स्वत: ठेका धरून नाचताना दिसत आहेत .

सदर पार्टी ही कळंगूट येथील एका गेस्ट हाऊसमध्ये रविवारी आयोजिली होती. ठराविक लोकांसाठी निमंत्रित पार्टी होती व याशिवाय याचे नियोजन हे अत्यंत गुप्तपणे केले गेले असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र सायंकाळी या पार्टीचे दोन व्हिडिओ हे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर प्रत्येक गटांवर वाºयासारखे पसरले व हा चर्चेचा विषय बनला.

हळदोणा मतदारसंघाचे आमदार ग्लेन टिकलो यांनी ह्या विषयावर बोलताना, ” संबंधित व्हिडिओसंदर्भात मला कल्पना आहे. मात्र, पार्टीच्या परवानगीविषयी मला माहिती नाही. मला तिथे बोलवल्याने मी त्याठिकाणी भेट दिली. फक्त पाच मिनीटांसाठी मी आयोजनास्थळी उपस्थित होतो व त्यानंतर मी लगेच निघालो. ही पार्टी मी आयोजित केली नव्हती. तसेच पार्टीच्या आयोजनकर्ता कोण हे मला ठाऊक नाही ” अशी सारवासारव केली आहे .


शेअर करा