नगर ब्रेकिंग..नगर जिल्ह्यात सुधारित नियमावली लागू, वाचा काय आहेत नियम ?

शेअर करा

महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोना विषयक नवीन निर्बंध लागू केल्यानंतर अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी नव्याने आदेश काढले असून असून त्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर निर्बंध लागू केले आहेत.

गेल्या आठ दिवसांपासून नगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू लागले असून पन्नास ते शंभरपर्यंत वाढणारी रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून शंभरच्या पुढे देखील जात आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांवर अनेक निर्बंध लावण्यात आलेले आहे आहे तसेच नियमाची पायमल्ली करणाऱ्यांना दंड तसेच शिक्षेची तरतूद देखील करण्यात आली आहे. नवीन आदेश येईपर्यंत हे निर्बंध कायम राहणार असून त्यात अनेक सुस्पष्ट नियमावलीचा नव्याने उल्लेख करण्यात आलेला आहे.

काय आहे नवीन नियमावली ?

  • सलून व्यायाम शाळा मॉल बाजार चित्रपट गृह इथे क्षमतेच्या पन्नास टक्के उपस्थिती
  • रात्री दहा ते सकाळी आठ पर्यंत बंद लसीकरण पूर्ण झालेल्यांना परवानगी
  • उपहारगृह यास होम डिलिव्हरी साठी परवाना

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रवास

  • केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार
  • लसीचे दोन आवश्यक
  • आरटीपीसीआर चाचणी आवश्यक
  • संबंधित प्रवास कर्मचाऱ्यांना देखील नियम लागू

वैद्यकीय अत्यावश्यक सेवा

  • कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा प्रवास
  • आस्थापना मधील कर्मचाऱ्यांची लसीकरण आवश्यक

वाहतूक व्यवस्थेबाबत नियम

  • प्रत्येक फेरीनंतर वाहनांचे निर्जंतुकीकरण आवश्यक
  • बसमधील प्रवासी संख्येबाबत निर्धारित नियम
  • रेल्वेत कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेल्यांना प्रवेश
  • वाहनात विना मास्क प्रवेश देऊ नये तसे झाल्यास वाहनचालकास दंड

नागरिकांसाठी काय नियमावली ?

  • पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या समूहाला सकाळी पाच ते रात्री अकरापर्यंत एकत्र येण्यास मनाई
  • रात्री अकरा ते सकाळी पाच पर्यंत अतिमहत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त फिरण्यास बंदी

शासकीय कार्यालय

  • कार्यालय प्रमुख यांच्या लेखी परवानगीशिवाय इतरांना प्रवेश नाही
  • ऑनलाइन संवादासाठी व्हीसीची सुविधा करावी
  • बाहेरून येणाऱ्यांसाठी व्हीसीद्वारे बैठक व्यवस्था
  • कर्मचाऱ्यांना शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम
  • कोरोना अनुरूप वर्तनाचे काटेकोर पालन आवश्यक
  • कर्मचाऱ्यांचे थर्मल स्कॅनिंग व सॅनिटायझर आवश्यक

खाजगी कार्यालय

  • वर्क फ्रॉम होम ला प्रोत्साहन द्यावे
  • 50% कर्मचाऱ्यांची उपस्थिती
  • महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षा आवश्यक
  • कार्यालयीन कामासाठी अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास ओळखपत्र आवश्यक

समारंभ

विवाह अंत्यविधी सांस्कृतिक कार्यक्रमांना व राजकीय कार्यक्रमांना केवळ 50 व्यक्तींची उपस्थिती

शाळा महाविद्यालय

  • 15 फेब्रुवारी पर्यंत बंद
  • दहावी व बारावीच्या बोर्डाचे उपक्रम नियमानुसार
  • शिक्षकांचे अध्यापन व्यतिरिक्त कामकाज सुरू
  • शिक्षण विभागाच्या उपक्रमांसाठी परवानगी आवश्यक
  • स्विमिंग पूल,स्पा, वेलनेस सेंटर, मनोरंजन पार्क, गड किल्ले, पर्यटन स्थळ आधी पूर्णपणे बंद

अत्यावश्यक सेवेमध्ये नक्की काय ?

  • वैद्यकीय कारणासाठी
  • ॲनिमल केअर पेट शॉप
  • वनीकरन करण्यासंदर्भातील काम
  • विमान वाहतूक आणि संबंधित सेवा
  • किराणामाल भाजीपाला फळविक्रेते डेअरी बेकरी मिठाईचे दुकान
  • शिजवलेले अन्न खाद्य दुकान
  • विमान रेल्वे टॅक्सी ऑटो रिक्षा सार्वजनिक बस बस
  • प्राधिकरणाची मान्सूनपूर्व कामे
  • रिझर्व बॅंक व अत्यावश्यक नियुक्त केलेल्या संस्था
  • टेलिफोन सेवा देखभाल दुरुस्ती
  • मालवाहतूक पाणीपुरवठा सेवा
  • शेती बी बियाणे साहित्य आयात निर्यात
  • पेट्रोल पंप व मालवाहतूक सेवा
  • सुरक्षा सेवा इलेक्ट्रिक गॅस पुरवठा
  • पोस्ट विषय व सरकारी सार्वजनिक उपक्रम
  • अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कंपन्या व विमा मेडिकल व मायक्रो फायनान्स कंपनी

नागरिकांनी काय करावे ?

  • मास्कचा वापर योग्य पद्धतीने करावा
  • सहा फुटांचे सामाजिक आंतर
  • नाक डोळे चेहऱ्यांना स्पर्श करणे टाळणे
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यास बंदी
  • गर्दी टाळा सुरक्षित अंतर राखूनच नमस्कार
  • रुमाल हा मास्क म्हणून गणला जाणार नाही
  • हात वारंवार साबणाने धुणे आवश्यक
  • खोकताना शिंकताना टिशू पेपरचा वापर आवश्यक
  • आवश्यकते शिवाय घराबाहेर पडू नये

नियमाचे उल्लंघन केल्यास काय कारवाई

  • दुकाने सिनेमागृहे आदींनी नियमाचे उल्लंघन केल्यास प्रत्येकी पाचशे रुपये दंड
  • संस्था आस्थापना यांना दहा हजारांचा दंड
  • प्रमाणित कार्यपद्धतीचे उल्लंघन केल्यास 50 हजाराचा दंड
  • वाहनातील व्यक्ती वाहक पाचशे रुपयांचा दंड
  • संस्था एजन्सी वाहन मालक दहा हजार रुपये दंड व मालकाचे लायसन रद्द
  • वारंवार नियमाचे उल्लंघन झाल्यास पन्नास हजाराचा दंड व प्रसंगी कारावासही शिक्षा

शेअर करा