संतापजनक..कर्जाच्या वसुलीसाठी चक्क आईच्या कुशीतून दीड महिन्याची मुलगी पळवली

शेअर करा

महाराष्ट्रात आर्थिक अडचणीत सापडलेल्या परिवारावर डोळा ठेवून त्यांना आर्थिक मदत करून त्यानंतर त्यांचे शोषण करणाऱ्या व्यक्तींची काही कमी नाही अशीच एक घटना सातारा येथे उघडकीस आली असून सावकाराकडून 30 हजार रुपये कर्ज देऊन त्यानंतर झालेली रक्कम परत मिळावी म्हणून एका दाम्पत्याने चक्क दीड महिन्याच्या मुलीला आईच्या कुशीतून ओढून नेल्याची संतापजनक घटना समोर आलेली आहे.

‘ आधी पैसे दे आणि मग बाळ घेऊन जा नाहीतर तुला जीवे करीन ‘ अशी धमकी देखील या महिलेला देण्यात आली त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोराडे यांना गुरुवारी या प्रकाराची माहिती दिली.

उपलब्ध माहितीनुसार, सातारा येथील मंगळवार पेठ परिसरात ढोणे कॉलनी येथे राहणाऱ्या अभिषेक कुचेकर या युवकाने आर्थिक अडचणीमुळे सदर बाजार येथील एका खाजगी सावकाराकडून गेल्या वर्षी 30 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. अवाजवी पद्धतीने व्याजदर असल्याने कर्जाची मुद्दल आणि व्याज असे एकूण 60 हजार रुपये त्याने सावकार यास परत देखील केले होते मात्र सावकाराचे कुचेकर यांच्याकडून अजून पैसे घेणे आहे असे म्हणणे होते.

आरोपी सावकार आणि त्याची पत्नी हे कुचेकर यांच्याकडे वारंवार कर्जाचे व्याज बाकी आहे, असे म्हणत त्याला धमकावत होते. चार महिन्यांपूर्वी कुचेकर दाम्पत्याची दीड महिन्याची मुलगी पायल हिला सावकाराने उचलून नेले. अभिषेक आणि त्यांची पत्नी यांनी सावकाराच्या घरी जाऊन ‘ आमची मुलगी आम्हाला द्या ‘ अशी विनंती केली मात्र परत घरी आला तर पाय तोडून टाकीन आणि जीव घेईन अशी धमकी सावकाराने अभिषेक याला दिली त्यामुळे हतबल झालेला अभिषेक याने अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोराडे यांची भेट घेत घेतली असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे समजते .


शेअर करा