पुण्यात खळबळ..’ तू प्रेग्नेंट राहिली तरी कशी ? , पतीनेच अखेर आयुष्य संपवले

शेअर करा

महाराष्ट्रात कौटुंबिक हिंसाचाराच्या अनेक घटना समोर येत असताना अनेकदा पत्नी हीच पीडिता असल्याचे दिसून येत आहे हे मात्र क्वचित प्रसंगी पत्नीने दिलेल्या मानसिक त्रासाने देखील आत्महत्या केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अशीच एक घटना पुणे जिल्ह्यात समोर आले असून अवघ्या सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका पतीला पत्नीसह, सासू, मेहुणा आणि इतर दोन जणांनी वेळोवेळी मानसिक त्रास दिला म्हणून त्याने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना उरळीकांचन येथे घडलेली आहे.

राहुल विलास खेडेकर ( वय 32 खेडेकर मळा उरळी कांचन तालुका हवेली ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून याप्रकरणी त्याची पत्नी व इतर दोन जण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल यांचा विवाह 11 ऑगस्ट 2021 रोजी झालेला होता. लग्न दरम्यानच्या काळात पत्नीची आई ही खेडेकर यांच्या घरी आली होती. तिने मात्र मुलीचे याआधी देखील एक लग्न झालेले आहे हे राहुल याच्यापासून दडवून ठेवले. लग्न झाल्यानंतरही पत्नी पतीसोबत केवळ दोन ते तीन दिवस राहिली आणि त्यानंतर ती सातत्याने माहेरी जात होती.

पती राहुल याने एकदा तिचा मोबाईल हातात घेतला असता त्यामध्ये तिच्या पूर्वीच्या मित्रांचे देखील फोटो त्यात आढळून आले त्यावेळी तिने दम देऊन तू माझ्या मोबाईलला हात का लावलास ? असे म्हणून पती राहुल याला शिवीगाळ केली आणि ती निघून गेली. त्यानंतर थोड्या दिवसांनी ती परत आली तेव्हा तिने सोनोग्राफी करायची आहे असे पतीला सांगितल्यानंतर पती आणि तिच्यात प्रेग्नन्सीवरून वाद निर्माण झाला.

‘ आपले लग्न झाल्यानंतर जर आपल्यात शारीरिक संबंध झालेच नाहीत तर तू प्रेग्नेंट राहिली तरी कशी ? ‘ अशी पतीने विचारणा केली असता तिने त्याला शिवीगाळ केली आणि त्यानंतर ती माहेरी गेली ती पुन्हा सासरी आलीच नाही. राहुल याने एक डिसेंबर 2021 रोजी तिला वकिलामार्फत नोटीस देखील पाठवली होती मात्र आपल्या आयुष्यात असा प्रकार घडल्यानंतर राहुल हा निराश झालेला होता यातूनच त्याने पिकावर मारण्याचे तणनाशक औषध प्राशन करत आत्महत्या केली.


शेअर करा