ईडीची अभिनेत्री शिल्पा शेट्टीसोबत तिच्या पतीवर कारवाई , पुण्यात झाली कारवाई 

शेअर करा

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या ईडीच्या कारवाईला वेग आलेला असून आर्थिक फसवणूक प्रकरणात ईडीने नामांकित अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती उद्योगपती राज कुंद्रा यांची तब्बल 97 कोटी 80 लाखांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. 

शिल्पा शेट्टी हिच्या नावावर मुंबईतील जुहू इथे एक सदनिका आणि पुण्यात एक फ्लॅट असून बिटकॉइन कंपनीच्या माध्यमातून फसवणूक केल्याचा आरोप ठेवत ईडीने ही कारवाई केलेली आहे. 

बिटकॉइन कंपनीच्या नावाने संकेतस्थळ बनवले आणि त्यावर कोट्यवधी रुपयांची नागरिकांची फसवणूक केली असा आरोप ईडीकडून करण्यात आलेला असून याच प्रकरणात पूर्वी पुणे पोलिसांनी अमित भारद्वाज आणि विवेक भारद्वाज या दोन भावांना अटक केलेली होती. 


शेअर करा