माझ्यासोबत फोनवर बोलत जा , राहुरीत महिलेला ब्लॅकमेल केलं अन 

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक असा प्रकार राहुरी समोर आलेला असून तू माझ्यासोबत फोनवर बोलत जा नाहीतर तुझी बदनामी करून टाकील असे म्हणत एका आरोपीने महिलेचा विनयभंग केलेला आहे. राहुरी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीस जेरबंद केलेले आहे. पीडित महिलेने बोलण्यास नकार दिला त्यानंतर आरोपीने तिला शिवीगाळ आणि दमदाटी करून तिच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे गंठण देखील काढून घेतले होते. 

उपलब्ध माहितीनुसार , साईनाथ भाऊसाहेब भुजबळ ( राहणार गंगापूर तालुका राहुरी ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या काही तासांच्या आत आरोपीला जेरबंद करण्यात आलेले आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. 

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल इंगळे , पोलीस हवालदार सोमनाथ जायभाय , पोलीस नाईक देविदास कोकाटे , रवी पवार यांनी कारवाईत भाग घेतलेला होता.


शेअर करा