आचारसंहिता लागलीय सोनं कुठं घालता अंगावर , केडगावमध्ये अडवलं अन.. 

शेअर करा

नगरमध्ये फसवणुकीचा एक अद्भुत असा प्रकार समोर आलेला असून आपण पोलिस आहोत असे सांगत ‘ सध्या आचारसंहिता लागलेली आहे सोन्याची चैन घालू नका ‘ असे म्हणत एका एका व्यावसायिकाची सुमारे सहा लाख रुपयांची सोन्याची चैन लंपास करण्यात आलेली आहे. केडगाव उपनगरातील ही घटना आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , बाबुराव नारायण काकडे ( वय 68 राहणार राजेंद्र नगर केडगाव ) असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून दुचाकीवरून ते त्यांच्या दुकानात चाललेले होते त्यावेळी केडगाव वेशीजवळ त्यांना दोन अनोळखी व्यक्तींनी थांबायला सांगितले आणि आम्ही पोलिस आहोत आचारसंहिता सुरू असताना तुम्ही अंगात सोन्याची चैन कशी घातली ? असे म्हणत तुमच्या गाडीवर संशय आहे तुम्ही तुमच्या गाडीच्या डिक्कीतून गांजा घेऊन चाललेले आहात असे म्हणत गाडीची डिक्की उघडण्यास भाग पाडले. 

आरोपींनी त्यानंतर काकडे यांना गाडीची डिकी उघडून दाखवली . आरोपींनी त्यास गाडीच्या डिक्कीत तुमचे सोन्याची चैन ठेवून द्या असे सांगत फिर्यादी यांना सोन्याची चैन डिक्कीत ठेवण्यास भाग पाडले मात्र याचवेळी हातचलाखी करत दोन्ही आरोपींनी त्यांची चैन लंपास केलेली आहे ही बाब फिर्यादी यास काही अंतर पुढे गेल्यावर लक्षात आली त्यानंतर त्यांनी कोतवाली पोलिसात संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.


शेअर करा