भर रस्त्यात महिलेला अडवलं अन.. , तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल

शेअर करा

नगरमध्ये सध्या पोलीस दल निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त असल्याकारणाने लुटमारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक प्रकार नगर शहरात समोर आलेला आहे. तारकपूर परिसरातील आयुष हॉस्पिटलसमोर एका चोरट्याने महिलेला धक्काबुक्की करून तिच्या गळ्यातील गंठण ओरबाडून पलायन केलेले आहे. तोफखाना पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

उपलब्ध माहितीनुसार , निर्मला अनुप ढोरमले ( राहणार जातेगाव तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर ) असे फिर्यादी महिला यांचे नाव असून शिक्षिका असलेल्या महिला शुक्रवारी सकाळी पत्रकार चौकापासून डीएसपी चौक रस्त्याने जात असताना आयुष हॉस्पिटलसमोर एक व्यक्ती आला आणि त्यांच्या गळ्यातील गंठण ओरबाडून त्याने पलायन केले. निर्मला यांनी आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत आरोपी फरार झालेला होता.


शेअर करा