महाराष्ट्र हादरला..प्रेयसीच्या पतीसह तिच्या सासू सासऱ्यांनी ‘ आक्षेपार्ह ‘ अवस्थेत पाहिले अन ..

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून नंदुरबार जिल्ह्यात शेजारी राहणाऱ्या व्यक्तीचे पत्नीशी अनैतिक संबंध आहेत याचा पतीला संशय होता मात्र एके दिवशी दोघांना सोबत पाहिल्यानंतर पतीच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याने त्याच्या आई वडिलांसह पत्नीच्या प्रियकराच्या गुप्तांगावर जबर मारहाण करत त्याला जागीच ठार केले. आरोपीचे आई आणि वडील यांच्यासह तीन जणांनी हा प्रकार केलेला असून सदर घटना नवापूर तालुक्यातील तारापूर येथे उघडकीला आली आहे. विसरवाडी पोलिसांनी अवघ्या बारा तासात तीन संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुका नवापूर येथील पराग सुरेश वळवी याचे त्याच्या घराजवळ राहणाऱ्या मंगलदास उर्फ सावन वळवी नावाच्या व्यक्तीच्या पत्नीच्या सोबत अनैतिक संबंध होते. सदर प्रकाराची मंगलदास याला कुणकुण लागली होती तर मंगलदास त्याच्या आई-वडिलांना देखील हा प्रकार माहीत झालेला होता.

पराग वळवी याचे मंगलदास उर्फ सावन विनायक वळवी याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते खून झाला. त्या दिवशी पराग हा आरोपीच्या पत्नीला भेटायला शेतात गेला होता. महिलेचा पती आणि सासू सासरे यांनी शेतातील घरात त्यांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले आणि त्यातून या तीनही जणांनी मिळून पराग त्याच्या गळ्यावर आणि गुप्तांगावर जोरदार प्रहार केले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर या तीनही जणांनी त्याचा मृतदेह दीडशे फूट अंतरावर दुसऱ्या ठिकाणी जाऊन फेकून दिला आणि पुरावा देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

महिलेचा पती मंगलदास उर्फ सावन विनायक वळवी , सासरे विनायक गुलामजी वळवी, सासु रमाबाई विनायक वळवी यांना ताब्यात घेतल्यानंतर चारित्र्याच्या संशयावरून त्यांनी पराग वळवी याचा खून केल्याची कबुली दिली असून इतरही कारण यात आहे का ? याचा शोध सुरू असल्याचे समजते.


शेअर करा