धक्कादायक..पीडिता म्हणतेय क्लासचे ‘ सीसीटीव्ही फुटेज ‘ चेक करा

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे उघडकीला आली असून कोचिंग क्लासच्या शिक्षकाने त्याच्याच क्लासमध्ये शिकणार्‍या एका विद्यार्थिनीचा विनयभंग केलेला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी रविवारी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

अंबरनाथच्या स्वानंद शॉपिंग सेंटर मध्ये राहुल यादव याचे कोचिंग क्लासेस सुरू आहेत. याच क्लासमध्ये एक विद्यार्थिनी 2020 पासून शिक्षण घेत होती या काळात जास्त मार्क कसे मिळवायचे याचे मार्गदर्शन तो करत असायचा मात्र या मार्गदर्शनाच्या नावाखाली हा आपल्याला जबरदस्तीने क्लासमध्ये बसून ठेवायचा, अश्लील व्हिडिओ दाखवून आपल्यासोबत गैरवर्तन करायचा. त्याचे हे चित्रीकरण क्लासच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेले असून त्याचा व्हिडिओ मी व्हायरल करेल, अशी धमकी देखील तो द्यायचा असे मुलीचे म्हणणे आहे.

पीडित मुलीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पॉक्सो कायद्यान्वये आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर घुगे हे पुढील तपास करत आहे .


शेअर करा