‘ मोदी हटाव देश बचाव ‘ , राजधानी दिल्लीत फ्लेक्स झळकले अन ..

शेअर करा

राजधानी दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी मोदी हटाव देश बचाव असे पोस्टर लागलेले आहेत. सध्या दिल्ली या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू असून दिल्ली पोलिसांनी अनेक ठिकाणी हे पोस्टर हटवले आहेत आणि पोस्टर लावणाऱ्या कथित व्यक्तींच्या विरोधात एफआयआर देखील दाखल केलेले आहेत. आत्तापर्यंत दिल्लीत शंभरपेक्षा जास्त एफआयआर दाखल करण्यात आलेले असून सहापेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे तर दुसरीकडे गोदी मीडिया यांनी ‘ मोदी हटाव देश बचाव ‘ ही घोषणा चक्क आपत्तीजनक आहे असे सांगण्यास सुरुवात केलेली आहे. ‘ मोदी हटाव देश बचाव ‘ यामध्ये आपत्तीजनक काय आहे हा प्रश्न कुठल्याही नागरिकाला पडल्याशिवाय राहणार नाही कारण याआधी देखील अशा अनेक घोषणा पक्षांकडून देण्यात आलेल्या आहेत.

पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतलेले असून एका राजकीय पक्षाने आम्हाला हे पोस्टर लावण्यात सांगितलेले होते अशी काही जणांनी माहिती दिली आहे . नियमाप्रमाणे पोस्टर लावल्यानंतर पोस्टर कुठे छापले त्याचा नंबर दिला जातो मात्र या पोस्टरवर नंबर नसल्याने पोलिसांसमोर देखील तपासाचे आव्हान उभे राहिलेले आहे. सोशल मीडियावर देखील केंद्र सरकारला टीका सहनच होत नाही त्यामुळे अशा व्यक्तींवर कारवाई केली जात आहे असा देखील एक सूर आहे.


शेअर करा