नग्न फोटोला नकार देताच म्हणाला ‘ व्हिडीओ कॉलवर तरी.. ‘, नगरमध्ये गुन्हा दाखल

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या नागपूरच्या सावनेर परिसरात समोर आलेले असून केळवद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या हद्दीत इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या एका मुलीची इंस्टाग्रामवर नगर येथील रहिवासी असलेल्या एका तरुणासोबत ओळख झालेली होती त्यानंतर या तरुणाने तिला व्हिडिओ कॉलवर नको तो प्रकार करायला सांगितला आणि आरोपीने त्याचे शूटिंग काढत त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ तिच्या नातेवाईकांना आणि पालकांना पाठवले. आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तपास सुरु आहे .

उपलब्ध माहितीनुसार, अनिल कराड ( राहणार अहमदनगर ) असे आरोपी तरुणाचे नाव असून सदर मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती आहे. ती आणि आरोपी यांची इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. मुलीकडे स्वतःचा फोन नसून आईच्या फोनवरती इंस्टाग्राम वापरते. आरोपीने तिला मेसेज केला आणि त्यानंतर त्यांच्यात संवाद सुरू झाला. काही दिवसांनी आरोपीने तिला व्हिडिओ कॉलच्या दरम्यान नग्न फोटोविषयी विचारलेले होते त्यामध्ये तिने नकार दिल्यानंतर व्हिडिओ कॉलमध्ये तू फक्त कपडे काढ असे देखील तो म्हणाला त्यावेळी आरोपीने तिचे काही स्क्रीन शॉट काढून घेतले.

काही दिवसानंतर त्यांच्यात काहीतरी बिनसलं आणि या मुलीने आरोपी सोबत बोलणे बंद केले. आरोपी वारंवार तिला बोलण्यासाठी त्रास देत होता मात्र तिने नकार दिल्यानंतर त्याने तिचे ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. धक्कादायक बाब म्हणजे त्याने अल्पवयीन मुलीचे नातेवाईक आणि तिच्या मित्रांना देखील हे फोटो पाठवले त्यानंतर हा प्रकार अल्पवयीन मुलीच्या आईच्या लक्षात आला आणि केळवद पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


शेअर करा