‘ मामाचा अपघात ‘ झालाय म्हणत गाडीवर बसली , काही अंतर जाताच..

शेअर करा

महाराष्ट्रात फसवणुकीचा आणि लुटमारीचा एक अद्भुत प्रकार जालन्यात समोर आलेला असून मामाचा अपघात झालेला आहे असे सांगत एका महिलेने दुचाकीवर लिफ्ट घेतली आणि त्यानंतर या तरुणाला जालना जिल्ह्यातील बदनापूर इथे सोडण्याची विनंती केली मात्र रस्त्यात या तरुणाला अडवून माझ्या बहिणीला कुठे पळून नेतो असे म्हणत त्याला बलात्कार आणि ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्याच्याकडून फोन पे वरून 18000 आणि नंतर तब्बल 80 हजार अशी सुमारे एक लाखांची खंडणी वसूल करण्यात आलेली आहे.  कदिम जालना पोलीस ठाण्यात एका महिलेसोबत पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , फिनकेअर स्मॉल फायनान्स या खाजगी कंपनीत तक्रारदार जांबुवंत वाल्मीक शिरसाट ( राहणार धनगर पिंपळगाव तालुका अंबड ) हा काम करत असून 30 नोव्हेंबर रोजी मुक्तेश्वर द्वार येथून मोतीबाग कडे जात असताना एका महिलेने त्याला हात दाखवून थांबवले आणि माझ्या मामाचा बदलापूर एक्सीडेंट झालेला आहे असे करून बदनापूर येथे सोडण्याची विनंती केली. 

माणुसकीच्या नात्याने जांभुवंत याने महिलेला आपल्या सोबत घेतले आणि स्वतःचे काम सोडून तिला बदनापूर येथे सोडण्यासाठी निघाला मात्र याच दरम्यान कुसळे फाट्याजवळ चार चाकी गाडीतून चार जण आले आणि त्याला अडवत माझ्या बहिणीला कुठे पळून नेतो ? असे म्हणत बेदम मारहाण करण्यास सुरू केले . आरोपींनी त्यानंतर फिर्यादी यास गाडीत बसवले आणि त्याला बलात्कार आणि खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्यात अडकवतो असे सांगत त्याच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. 

आरोपींनी त्यानंतर दमदाटी करत त्याच्याकडून तब्बल 18 हजार रुपये ऑनलाईन माध्यमातून जमा करून घेतले आणि त्यानंतर त्याला किडनॅप करून एका ठिकाणावरून बॉण्ड घेऊन शेअर मार्केट साठी साडेतीन लाख रुपये आणि एक लाख रुपये आपण घेतलेले आहेत असे सांगत त्याच्या सह्या देखील घेतल्या . छत्रपती संभाजीनगर येथील एका लॉजमध्ये त्याला डांबून ठेवले. तिथे देखील त्याला अशाच पद्धतीने पैशाचा तगादा सुरू केला  त्यानंतर फिर्यादी यांच्या आत्याच्या मुलाच्या फोनवरून तब्बल 80 हजार रुपये देखील गुगल पे च्या माध्यमातून आरोपींनी उकळले. नाश्ता करण्यासाठी म्हणून बाहेर गेल्यानंतर आरोपींच्या तावडीतून तरुणाने सुटका करून घेतली आणि  स्वतःच्या घरी आला. घरी आल्यानंतर देखील आरोपींकडून पैशाची मागणी सतत होत होती त्यामुळे अखेर कदीम जालना पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे.


शेअर करा