सुरुवातीला अकस्मात पण पत्नीचा ‘ वेगळाच ‘ दावा, सहा जणांवर गुन्हा दाखल

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार नाशिक जिल्ह्यातील चांदवड इथे समोर आलेला असून एका तरुणाने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या पत्नीने फिर्याद दिल्यानंतर चांदवड पोलिसात सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , भूषण उर्फ नारायण उर्फ रमेश साळी ( वय 35 वर्ष ) असे मयत तरुणाचे नाव असून आठ जानेवारी रोजी पहाटे त्याने राहत्या घरी आत्महत्या केली होती . पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली मात्र त्यांची पत्नी नीता यांनी चांदवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानंतर सहा संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटलेले आहे की , तिचा पती भूषण साळी यास चांदवड येथील तीन महिला आणि तीन पुरुष यांनी व्याजाने पैसे दिलेले होते . पैसे वसूल करण्यासाठी आपल्या पतीला सर्व सहा संशयित वेळोवेळी मोबाईलवर फोन करत सातत्याने पैशाचा तगादा लावायचे . पैसे वसूल करण्यासाठी मानसिक त्रास दिल्यानंतर आपल्या पतीने आत्महत्या केली , ‘ असे त्यांचे म्हणणे आहे. 

मनीषा ठाकरे , तिची मुलगी , अनिता घोडके , आकाश सूर्यवंशी , सचिन भापकर आणि शोएब घासी अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे असून पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे तपास सुरू आहे.


शेअर करा