‘ तुमच्या घराचे दार उघडे ‘, पोलीस अधीक्षक कार्यालयात असतानाच फोन अन

शेअर करा

महाराष्ट्रात सध्या भुरट्या चोरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत असून असाच आणखी एक प्रकार समोर आलेला आहे . बीड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेले प्रमोद रंगनाथराव देशपांडे यांचे जालना जिल्ह्यातील अंबड रोडवरील घर चोरट्याने फोडून घरातील सोन्याच्या अंगठ्या आणि इतर असा सुमारे 60000 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे . 20 जानेवारी रोजी हा प्रकार घडलेला असून सोमवारी तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , मूळचे जालना जिल्ह्यातील रहिवासी असलेले प्रमोद देशपांडे हे बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत आहेत . जालना इथून ते रोज बीडला अपडाऊन करतात . 20 जानेवारी रोजी बीड येथे ते ड्युटीवर असताना त्यांच्या शेजारी असलेले मस्के यांनी त्यांना फोन करून तुमच्या घराचे दार उघडे आहे असे सांगितले . देशपांडे यांनी त्यांचा भाऊ दिनेश यांना तिथे पाठवले त्यावेळी घरात चोरी झाल्याचे समोर आलेले आहे. 

देशपांडे घरी आल्यानंतर त्यांनी 22 तारखेला तालुका पोलिसात या प्रकरणी फिर्याद दाखल केलेली असून घरातील सामान ते आले त्यावेळी अस्ताव्यस्त पडलेले होते . घरातील अडीच तोळे सोन्याच्या दोन अंगठ्या आणि सोन्याचे तुकडे असा सुमारे 60 हजार रुपयांचा ऐवज गायब झालेला असून तालुका पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 380 457 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 


शेअर करा