‘ नकुशी ‘ सापडल्याने परिसरात खळबळ , अल्पवयीन मुलगी ताब्यात अन आरोपी

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक असे प्रकरण सध्या समोर आलेले असून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी शहरात शिवाजीनगर इथे मोकळ्या जागेत अवघ्या तीन दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक आढळून आलेले आहे.  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यानंतर या अर्भकाला रुग्णालयात पाठवण्यात आले. एका अल्पवयीन मुलीने हे अर्भक फेकल्याचे समोर आले असून तिच्यावर अतिप्रसंग झाल्यानंतर ती गर्भवती राहिलेली होती आणि त्यानंतर तिने बाळाला जन्म दिला मात्र त्यानंतर तिने या नकुशीला फेकण्याचा प्रकार केलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , संतोष कुमार सैनी ( वय 58 राहणार कानपूर उत्तर प्रदेश हल्ली राहणार दिंडोरी ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून पीडित मुलगी अवघी नऊ वर्षाची असल्यापासून आरोपी तिच्या सोबत लैंगिक अत्याचार करत होता . मुलगी सहावीत गेली त्यानंतर तिने शाळा देखील सोडून दिली मात्र आरोपी संतोष कुमार हा तिचे लैंगिक शोषण वारंवार करत असायचा. 

पोलिसांनी तपासाला सुरुवात केली त्यावेळी जन्मदात्री आईने मुलगी नको म्हणून हा प्रकार केला असल्याचा पोलिसांना संशय होता मात्र परिसरात चौकशी केल्यानंतर तेरा वर्षांच्या मुलीने एका बाळाला जन्म दिल्याची माहिती मिळाली . पोलिसांनी तिला ताब्यात घेतले त्यावेळी तिने झालेला प्रकार कथन केला असून पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे,  पोलीस उपनिरीक्षक मोनिका जजोट यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. 


शेअर करा