बिबट्याकडून महिलेला ओढून नेण्याचा प्रयत्न , श्रीगोंद्यात खळबळ

शेअर करा

अवघ्या काही दिवसांपूर्वी श्रीगोंद्यात एका अल्पवयीन मुलीचा जीव घेतल्यानंतर देखील बिबट्याचा त्रास परिसरात कमी होताना दिसून येत नाही. पुन्हा एकदा श्रीगोंदा तालुक्यातील अजनूज जवळ म्हसोबावाडी येथे शुक्रवारी २९ तारखेला रात्री बिबट्याने महिलेवर हल्ला करून तिला ओढून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेजारील मंडळी गोळा झाल्यानंतर बिबट्या तिथून पळून गेला. 

जखमी महिलेला पुणे जिल्ह्यातील दौंड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेले असून अवघ्या काही दिवसांपूर्वीच लक्ष्मी गायकवाड ( मूळ राहणार पाटोदा चाळीसगाव) या चिमुरडीचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालेला होता . 29 तारखेला पुन्हा असाच प्रकार घडला असून ग्रामस्थांमध्ये त्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. बिबट्याला पकडण्याबद्दल कारवाई केली जात नसल्याचा देखील संताप ग्रामस्थांनी व्यक्त केलेला आहे. 


शेअर करा