महिलेची वाट अडवत विनयभंग , न्यायालयाने दिली ‘ ही ‘ शिक्षा

शेअर करा

राज्यात महिलांच्या छेडछाडीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक प्रकार नाशिकमध्ये समोर आलेला आहे. एका पादचारी महिलेची वाट अडवत तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोन वर्ष सश्रम कारावास आणि 21000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. 

सन 2020 मध्ये याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. आयुब अब्बास अली शेख ( वय 47 वर्षे राहणार केवल पार्क ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून चुंचाळे शिवारातील दत्तनगर भागातील एक महिला 17 मार्च 2020 रोजी घरी जात असताना आरोपीने तिचा रस्ता अडवत विनयभंग केला आणि तिला शिवीगाळ करत मारहाण देखील केलेली होती. 

आरोपी याने महिलेच्या पतीला आणि तिला जिवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर अंबड पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे यांनी तयार करत पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलेले होते. साक्षीदार आणि पंच तसेच तपासी अधिकाऱ्यांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य मानून ही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. सरकारतर्फे एडवोकेट शैलेंद्र बागडे यांनी काम पाहिले.


शेअर करा