लाचखोर आता महसूलमंत्र्यांना देखील सोडेनात , पुण्यातील फ्लॅटवर इतके लाख सापडले

शेअर करा

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अखत्यारीत असलेल्या एका सहकारी ट्रक वाहतूक संस्थेच्या व्यवस्थापकाकडून दहा हजार रुपये लाच घेताना एका व्यक्तीला रंगेहाथ पकडण्यात आलेले होते. सदर व्यक्ती हा वर्ग दोन कर्मचारी असून वजन मापे निरीक्षक म्हणून काम करतो. पुण्यातील त्याच्या फ्लॅटवर झाडाझडती घेण्यात आलेली असून त्याच्या घरांमध्ये तब्बल साडे 28 लाख रुपये आढळून आलेले आहे . लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही रोकड ताब्यात घेतलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , अशोक श्रीपती गायकवाड असे आरोपी व्यक्तीचे नाव असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सहकारी संस्था चालवत असलेल्या पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापक असलेल्या व्यक्तीकडून लाच घेताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आलेले होते. 29 तारखेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केलेली होती. लोणी पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

तीस तारखेला आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले त्यावेळी त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली असून अशोक गायकवाड याने अशा पद्धतीने आणखीन किती संपत्ती कमावलेली आहे याचा देखील बारकाईने तपास सुरू करण्यात आलेला आहे . नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे , अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी , नगरचे पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली होती. 


शेअर करा