कधी मित्राच्या खोलीवर कधी जालना रोडवर , पीडित तरुणीची पोलिसात धाव 

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार बीडमध्ये समोर आलेला असून सुरुवातीला मैत्रीचे प्रेमात रूपांतर आणि त्यानंतर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर हे प्रकरण पोलिसात पोहोचलेले आहे. पीडित तरुणीने आरोपीवर लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याचा आरोप केलेला आहे. आरोपीने तिला कधी मित्राच्या खोलीवर तर कधी जालना रोडवरील लॉजमध्ये नेले आणि त्यानंतर तिचे लैंगिक शोषण केले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपीवर ॲट्रॉसिटी आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , अभिषेक पंजाब शिंदे असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याने लग्नाचे आमिष दाखवत तरुणीला आपल्या जाळ्यात ओढलेले होते. आरोपीने तिला कधी मित्राच्या खोलीवर तर कधी जालना रोडवरील एका लॉजमध्ये घेऊन जात जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित तरुणीचे नाव बावीस वर्षे असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 


शेअर करा