‘ तुझ्या बहिणीला घेऊन जा नाहीतर.. ‘, मेहुणा हातापाया पडला पण दाजीने अखेर.. 

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक असे प्रकरण छत्रपती संभाजी नगरजवळील वाळूज परिसरात समोर आलेले असून माहेराहून पाच लाख रुपये आणले नाहीत म्हणून मारहाण करत पत्नीचा गळा दाबून खून करण्यात आलेला आहे . रांजणगाव इथे एक तारखेला ही घटना समोर आलेली असून खून केल्यानंतर पती स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झालेला होता. 

उपलब्ध माहितीनुसार , सुनिता मदन बेडवाल ( राहणार वझर जिल्हा जालना सध्या राहणार रांजणगाव तालुका गंगापूर छत्रपती संभाजीनगर ) असे मयत महिलेचे नाव असून महिलेचा पती मदनबाबू सिंग बेडवाल ( वय 30 ), सासू रुक्माई बाबू सिंग बेडवाल ( वय 58 ) सासरा बाबू सिंग बेडवाल ( वय 65 ) आणि दीर रामेश्वर बाबू सिंग बेडवाल ( वय 24 सर्वजण राहणार गणेश नगर ) यांना अटक करण्यात आली आहे. 

मयत महिला ही तिचा पती मदन बेडवाल आणि चार वर्षांच्या मुलासोबत रांजणगाव येथे राहत होती. मदन हा एका कंपनीत काम करायचा आणि आई वडील देखील बाजूलाच राहत होते सर्व आरोपी हे सुनीता यांना माहेराहून पैसे आण म्हणून छळ करत असायचे. माहेरी भावाला ही गोष्ट सांगितल्यानंतर भावाने तिला फ्रिज आणि दुचाकी देखील घेऊन दिली मात्र मागील चार रुपये महिन्यांपासून पाच लाख रुपये घेऊन ये असे म्हणत तिचा सातत्याने छळ सुरू होता. 

माहेरच्या व्यक्तींनी अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपींच्या वृत्तीत काहीच बदल झाला नाही . मयत महिला यांचा भाऊ संजय महेर याने आरोपी मदन याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याने पैसे घेऊन ये नाहीतर तुझ्या बहिणीला घेऊन जा नाहीतर मी मारून टाकील अशी धमकी दिली . 

शुक्रवारी पहाटे आरोपी मदन हिने सुनीता यांचा गळा दाबून खून केला आणि एमआयडीसी वाळूज पोलीस स्वतःहून हजर होत ‘ मी माझ्या पत्नीचा खून केलेला आहे’  अशी माहिती दिली . सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख , वाळूज एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक कृष्णचंद्रा शिंदे यांनी पथका सह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सुनिता यांना ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. 


शेअर करा