तिसगावमध्ये अपहरण कांड , शेअर मार्केट करतोस काय म्हणत उचलले आणि.. 

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट च्या कामासाठी पुण्याला निघालेल्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यात करणाऱ्या तरुणाचे तिसगावमधून अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर त्याच्याकडून 15 लाख रुपये उकळून त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. रविवारी 17 तारखेला संध्याकाळी ही घटना घडलेली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , अनिरुद्ध मुकुंद धस ( राहणार एरंडगाव तालुका शेवगाव ) असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून रविवारी अनिरुद्ध हे त्यांचे मित्र वैष्णव शिंदे यांच्यासोबत पुण्यामध्ये कामाकरिता निघालेले होते. तिसगाव शिवारात पाठीमागून आलेल्या एका विनाक्रमांकाच्या पांढऱ्या गाडीने अनिरुद्ध यांच्या गाडीला गाडी आडवी लावली आणि त्यानंतर आमच्या गाडीला कट का मारला ? असे म्हणत जबरदस्तीने मारहाण सुरू केली आणि त्यानंतर अनिरुद्ध यांना किडनॅप करण्यात आले. 

सर्व आरोपींनी त्यांच्या डोक्याला बंदूक लावून ‘ शेअर मार्केट करतो साठ लाख रुपये दे नाहीतर तुला मारून टाकू ‘ असे म्हणत कासार पिंपळगाव मार्गे जवखेडे रस्त्याने घेऊन गेले. घाबरून गेलेले धस यांनी आपल्या मित्राला बोलावून 15 लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले त्यावेळी मित्र पैसे घेऊन आल्यानंतर मोटरसायकलवरील एका युवकाने पैशाची बँक हिसकावून मीडसांगवीच्या दिशेने पलायन केले असे अनिरुद्ध यांनी फिर्यादीत म्हटलेले आहे. पाथर्डी पोलीस याप्रकरणी तपास करत असल्याची माहिती आहे .


शेअर करा