आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील पथकाला हे पोस्टर दिसले नाही का ? 

शेअर करा

नगर शहरात आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी महापालिका प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय प्रचंड प्रयत्नशील असले तरीदेखील काही उत्साही कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याचा फोटो लावण्याचा मोह आवरत नसून आचारसंहितेचे यामुळे उल्लंघन होत आहे . 

नगर शहरातील रेसिडेन्शिअल शाळेसमोर असलेल्या बस थांब्यावर संग्राम जगताप यांच्या एका कार्यकर्त्याने बसस्टॉपवरच शिवजयंतीच्या नावाचा फ्लेक्स लावलेला असून त्यावर आमदार संग्राम जगताप यांच्यासोबत स्वतःचा फोटो निखिल गहिले मित्रपरिवाराने लावलेला आहे. प्रचंड वाहतूक असलेल्या या रस्त्यावर लावलेले पोस्टर अद्यापपर्यंत आचारसंहिता अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील असलेल्या पथकाच्या दृष्टीपथात आलेले नाही हे विशेष..

आतापर्यंत महापालिका प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी अहोरात्र कार्यरत आहे मात्र तरीदेखील काही उत्साही कार्यकर्ते या पथकाचे काम आणखीन वाढवत असून वास्तविक आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी अशा उत्साही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची नितांत गरज आहे तरच अशा प्रकारांना आळा बसू शकेल..  


शेअर करा