‘ नियोजित ‘ वधूसोबतची धुळवड अंगलट,  हातात पडल्या बेड्या

शेअर करा

पोलीस मागावर असताना एका व्यक्तीचे लग्न जुळले . फोनवर होणाऱ्या पत्नीसोबत बोलणं सुरु झाला मात्र धुळवड खेळण्यासाठी आला आणि अलगदपणे पोलिसांच्या ताब्यात अडकला. स्थानिक गुन्हे शाखेने त्याला अटक केलेली असून त्याच्याकडून तीन गुन्हे उघड करण्यात आलेले आहेत. गेवराई तालुक्यातील नागझरी परिसरात ही कारवाई करण्यात आलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , भगवान उर्फ भग्या ईश्वर भोसले ( वय 21 वर्ष राहणार बेलगाव जिल्हा अहमदनगर ) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या विरोधात आत्तापर्यंत तीन गुन्हे उघड झालेले आहेत. त्याचे नागझरी येथील एका तरुणीसोबत लग्न जुळलेले होते आणि तिला भेटण्यासाठी तो येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला लागलेली होती. 

शुक्रवारी जेवण करून तो फेरफटका मारण्यासाठी नागझरी इथे आला याच दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला याप्रकरणी गुप्त सूत्रांच्या माध्यमातून माहिती समजली आणि त्यानंतर गेवराई पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. नगर सोलापूर जिल्ह्यात त्याच्यावर पंधरा ते वीस गुन्हे दाखल असून त्याचे काही साथीदार मात्र अद्यापही फरार आहेत. 


शेअर करा