इंजिनदादा इंजिनदादा काय करता ? , सुषमाताई अंधारे यांचा राज ठाकरेंवर निशाणा 

शेअर करा

ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमाताई अंधारे यांनी मनसे नेते राज ठाकरे यांच्यावर एक विडंबनात्मक कविता केलेली असून एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही कविता म्हटलेली आहे. सुषमाताई अंधारे या इन्स्टंट कविता रचण्यात पारंगत असून त्यांनी इंजिन दादा इंजिन दादा काय करता ? अशी कविता एका कार्यक्रमात म्हणून दाखवली . 

काय आहे सुषमाताई अंधारे यांनी केलेली कविता ? 

इंजिनदादा इंजिनदादा काय करता?

पुड्या मी सोडतो, तुम्हा बनवतो, थापा मी मारतो, नव्या नव्या

इंजिनदादा इंजिनदादा काय करता?

ब्ल्यू प्रिंट आणतो, पीपीटी करतो, घोषणा करतो, नव्या नव्या

इंजिनदादा इंजिनदादा काय करता?

खट्यॅक करतो, पाट्या मी फोडतो, टोलनाक्यावर जातो, नव्या नव्या

इंजिनदादा इंजिनदादा काय करता?

बृजभूषणला घाबरतो, भैयांना चोपतो, धमक्या मी देतो, नव्या नव्या

इंजिनदादा इंजिनदादा काय करता?

शुकशुक मी करतो, डोळा मी मारतो, भानगडी करतो, नव्या नव्या

इंजिनदादा इंजिनदादा काय करता?

पार्कात जातो, गर्दी जमवतो, वल्गना करतो, नव्या नव्या

इंजिनदादा इंजिनदादा काय करता?

मांडवली करतो, पाठिंबा देतो, बिनशर्त म्हणतो,

सुखात नाहतो नव्या नव्या, सुखात नाहतो नव्या नव्या

इंजिनदादा इंजिनदादा काय करता?


शेअर करा