नगरमध्ये सामाजिक कार्यकर्ते सुरज नामदे यांना बेदम मारहाण , आधी घर पाडलं अन..

शेअर करा

गेल्या काही महिन्यांपासून नगर शहरातील अनधिकृत बांधकाम परवानग्या आणि गौरी घुमट परिसरातील एका दारूच्या गुत्त्यावर कारवाई व्हावी यासाठी प्रयत्नशील असलेले सुरज चंद्रकांत नामदे यांचेच घर 18 एप्रिल रोजी महापालिकेने काही प्रमाणात उध्वस्त केले. अतिक्रमणधारकाचे अतिक्रमण काढा अन्यथा मला माझ्या घराची नुकसान भरपाई द्या यासाठी सुरज नामदे यांनी महापालिकेसमोर 19 तारखेला ठिय्या आंदोलन सुरु केलेले होते. 

19 तारखेला संध्याकाळच्या सुमारास महापालिका आयुक्त यांच्यासमोर सुरज नामदे आणि समोरील व्यक्ती यांची बैठक झाली त्यानंतर सुरज नामदे आणि समोरील व्यक्ती हे घरी परतले. घरी परतल्यानंतर सुरज नामदे आणि दारूचा गुत्ता चालवत असलेले कुटुंबीय यांच्यात वाद उफाळून आला आणि त्यावेळी सुरज नामदे यांना बेदम मारहाण करण्यात आली. सुरज नामदे यांनी देखील आपल्याला मारहाण केलेली आहे असा आरोप करत समोरील व्यक्ती देखील जिल्हा रुग्णालयात ऍडमिट झालेले आहेत. आपल्या घराशेजारी असलेला दारूचा गुत्ता कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी सुरज नामदे गेल्या अनेक महिन्यांपासून करत आहेत त्यामुळे दोन्ही कुटुंबात वाद आहे . 

गौरी घुमट परिसरातील सावरकर उद्यान इथे अतिक्रमण हटवले की संबंधित व्यक्ती पुन्हा दोन दिवसात अतिक्रमण करतो आणि दारूचा गुत्ता चालवतो म्हणून कारवाईसाठी सुरज नामदे हे यासाठी प्रयत्नशील होते . महापालिका प्रशासनाने चार दिवसांपूर्वी त्यांना कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले होते मात्र तक्रारदार व्यक्तीचेच घर पाडण्याची कारवाई महापालिका प्रशासनाने केली. आपल्याला कोणी प्रश्न विचारले की त्यालाच पिंजऱ्यात उभे करायचे ही महापालिकेची पद्धत नेहमीची झालेली असल्याचा आरोप नगरकर करत आहेत. सुरज नामदे यांना गुप्तांगावर मारहाण करण्यात आलेली असून सध्या जिल्हा रुग्णालय इथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 


शेअर करा