निवडणूक रोख्यांवरून मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपला ठणकावलं , सरळ सरळ खंडणी अन..

शेअर करा

निवडणूक रोख्यांवरून सर्वोच्च न्यायालयाकडून कान उघडणी झाल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्यात कुठलाही पश्चाताप भावना दिसून येत नाही . दिलगिरी तर सोडा पण आपलेच खरे अशा पद्धतीने पंतप्रधान मोदी यांची आजही वक्तव्ये असून त्यांच्या या प्रकारावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कठोर शब्दात टीका केली आहे. 

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की , ‘ ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचे लोक पाठवायचे नंतर त्यांना बोलावून घ्यायचे . इलेक्ट्रॉनिक बॉण्ड घ्यायला लावायचे आणि निधीच्या मोबदल्यात कंत्राटे द्यायची ही पारदर्शक पद्धत आहे का ?  हा सरळ सरळ खंडणी उकळण्याचा आणि भ्रष्टाचारावर पांघरून घालण्याचा प्रकार आहे. विशेष म्हणजे निधी देणाऱ्या अनेक कंपन्या तोट्यात आहेत आणि काहींनी तर नफ्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी निधी दिलेला आहे ‘, असे म्हटलेले आहे

भाजपकडून सध्या जो काही युक्तिवाद निवडणूक रोख्यांविषयी करण्यात येत आहे तो संपूर्णपणे चुकीचा असल्याचा आरोप करत मल्लिकार्जुन खर्गे पुढे म्हणाले की , ‘ विरोधी पक्षांचे नेते कारवायाची भीती दाखवून फोडले जात आहेत.  ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केलेले होते त्यांनाच पक्षात घेऊन शुद्ध करून मांडीवर बसवले जाते. विरोधी पक्षांचे खच्चीकरण करण्याचे काम सुरू आहे. काँग्रेसने खूप वर्षाआधी 16 लाख रुपयांचा आयकर कमी भरला म्हणून आयकर विभाग त्यांना 135 कोटींची नोटीस पाठवतो आणि त्यानंतर अचानक 3657 कोटी रुपये फ्रिज केले जातात. विरोधकांना संपवण्याचा हा प्रकार असून आधी आम्ही बोलत होतो असे आता जनतेलाही असेच वाटू लागलेले आहे. बेरोजगारी महागाई हे देशापुढील गंभीर प्रश्न आहेत , ‘ असे देखील ते यावेळी म्हणाले .


शेअर करा