नगरकरांच्या घरात यंदाही शिरणार पाणी ,  महापालिकेच्या निविदेकडे फिरवली पाठ कारण.. 

शेअर करा

जून महिना जवळ आलेला असून पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढेनाले साफ करण्याची नितांत गरज आहे मात्र महापालिकेच्या या कामासाठी ठेकेदार उत्सुक नसल्याचे चित्र नगर शहरात आहे. उशिरा केलेली सफाई व्यवस्थित होणार नाही त्यामुळे पुन्हा एकदा नगरकरांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झालेला आहे. 

नगर शहरात सुमारे 21 पेक्षा अधिक ओढेनाले असून प्रत्यक्षात त्यांची संख्या यापेक्षा मोठी आहे मात्र अनेक ठिकाणी नागरिकांनी केलेली अतिक्रमणे यामुळे ओढेनाले बुजून गेलेले आहेत. काही ठिकाणी ओढ्यानाल्यांची रुंदी अत्यंत कमी झालेली असल्याने त्यामुळे पाणी तुंबून नागरिकांच्या घरात शिरते. नालेसफाईच्या या कामासाठी महापालिकेकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली मात्र महापालिकेच्या या कामाकडे कंत्राटदार पाठ फिरवत आहेत. 

नैसर्गिक प्रवाह अडवत अनेक ठिकाणी बांधकामांना परवानगी मंजूर करण्यात आल्या त्यामुळे नैसर्गिक प्रवाह असलेले 21 ओढेनाले आता वाढून सुमारे 41 झालेले आहेत . नगर शहरात केडगाव , बोल्हेगाव सावेडी परिसरात आणि शहराच्या इतर उपनगरात देखील हे ओढेनाले असून निविदेला प्रतिसाद न मिळण्याचे कारण देखील महापालिकेतील कथित टक्केवारी तसेच बिले वेळेवर न निघणे अशी चर्चा आहे. 


शेअर करा