अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला म्हणून जाब विचारला तर.., नगरमधील घटना

शेअर करा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला म्हणून त्याचा जाब विचारणाऱ्या मुलीच्या वडिलांना आणि चुलत्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील अहिल्यानगर शहरातील सारसनगर परिसरात घडलेला आहे. 28 तारखेला संध्याकाळी ही घटना घडली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , सुशांत विधाते ( वय 23 वर्ष राहणार भोसले आखाडा बुरूडगाव रोड ) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीने पीडित मुलीला घरासमोर बोलून तिचा हात पकडून तिच्यासोबत गैरवर्तन केले हे पाहून मुलीच्या वडिलांनी आणि चुलत्यांनी विरोध केला त्यानंतर आरोपीने त्याच्या एका साथीदाराला बोलावून मुलीच्या वडिलांना आणि चुलत्याला मारहाण केली.


शेअर करा