अन्यथा कुणाल कामराला पोलिसांच्या टायरमधला पाहूणचार , एकनाथ शिंदेंच्या ‘ ह्या ‘ मंत्र्याचा इशारा

शेअर करा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन केल्याप्रकरणी कॉमेडियन कुणाल कामराविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून कुणाल कामरा याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मद्रास उच्च न्यायालयानं कॉमेडियन कुणाल कामराला अटकपूर्व जामीन मंजूर केला असून ७ एप्रिलपर्यंत कामराला अटकेपासून संरक्षण मिळालं आहे. तो ३१ मार्च रोजी मुंबई पोलिसांसमोर हजर राहणार असून  राज्याचे पर्यटन व खणीकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिलीय. मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, कुणाला कामरा याची व्यक्तव्ये लिखाण यातून दोन समुदायात, दोन गटात, दोन विचारसरणीच्या लोकांमध्ये तेढ निर्माण होईल, अशांतता निर्माण होईल असे आहेत, असा आऱोप करुन मंत्री देसाई म्हणाले, कामरा हा शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांना टार्गेट करत आहे.

कुणाल कामराने सापडल्यानंतर सरळ मार्गाने त्याने केलेल्या गोष्टी कबुल केल्या नाहीत तर त्याला पोलिसांचा टायरमधील पाहूणचार द्यावा लागेल. त्याच्या संदर्भातील सर्व माहिती आमच्याकडे आहे. त्याचे कनेक्शन कोणाबरोबर आहेत, त्याच्या शो ला फंडींग कोण करत आहे याची माहिती आमच्याकडे आहे, असेही त्यांनी सांगितले.

मद्रास न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन देताना म्हटलंय की, कुणाल कामरा महाराष्ट्राच्या न्यायालयात जाऊ शकत नाही. त्याच्या जीवाला धोका असल्यानं तो इथं आलाय. कुणाल कामराला कायमस्वरुपी कायदेशीर कारवाई होईपर्यंत अटकेपासून दिलासा दिला जाईल. मुंबईच्या खार पोलिसांनी त्याला समन्स पाठवले असून चौकशीसाठी हजर रहायला सांगितलंय. मुंबई पोलिसांनी दोनदा समन्स बजावले असून आता तो ३१ मार्च रोजी मुंबई पोलिसांसमोर हजर राहणार आहे.


शेअर करा