नगर शहरात रेल्वे स्टेशन परिसरातील लोखंडी पुलावर मारहाण प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी वेगवेगळ्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने तीन जणांची यात निर्दोष मुक्तता केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, चैतन्य गाडळकर , ऋषभ लोढा , वीरेंद्र भारती अशी निर्दोष मुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. 17 ऑगस्ट 2021 रोजी ही घटना घडली होती आणि त्यानंतर चैतन्य गाडळकर, ऋषभ लोढा आणि वीरेंद्र भारती यांच्या विरोधात कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तसेच आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयात याप्रकरणी सुनावणी पार पडली मात्र आरोपींच्या विरोधात कुठलाही ठोस पुरावा न आल्याने तसेच बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत अतिरिक्त सत्र न्यायाधीश सीएम बागल यांनी आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे. आरोपींच्या वतीने एडवोकेट आकाश कावरे , एडवोकेट संजय वाल्हेकर , एडवोकेट राजेश कावरे आणि एडवोकेट कैलास कोतकर यांनी काम पाहिले.