लक्ष्मण हाके हा राजकारणातील राखी सावंत , कुणी केली टीका ? 

शेअर करा

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निशाणा साधला होता. आता हाकेंवरच त्यांचे जवळचे सहकारी मानले जाणारे हनुमंत धायगुडे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. 

हनुमंत धायगुडेंचे नेमके काय आरोप?

लक्ष्मण हाके ओबीसी समाजाच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग करतात, असा दावा करण्यात आला आहे. पोस्टमध्ये धायगुडे म्हणतात की, ” हाके हा समाजकारणातील राखी सावंत आहे. तो फक्त प्रसिद्धी, टीआरपी आणि पैशासाठी काहीही करायला तयार असतो. त्याला ओबीसी, गावगाडा किंवा अठरापगड जातींच्या समाजाशी काही देणं-घेणं नाही. तो एक भुरटा लुटारू आहे.”, असं म्हणत धायगुडेंनी हाकेंवर आरोप केलेत.

काही दिवसांपूर्वी लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना, “अजित पवार आठ दिवस सत्तेपासून दूर राहू शकत नाहीत. त्यांनी मागासवर्गीय समाजाचा निधी आपल्या लाडक्या बहिणीसाठी वळवला,” असा आरोप केला होता. अमोल मिटकरी यांनी देखील हाके यांच्यावर , “हाके यांनी स्वतःची गाडी फोडण्याची सुपारी आपल्याच लोकांना दिली होती जेणेकरून सहानुभूती मिळवता येईल., ‘ असे म्हटले होते.


शेअर करा