‘ आयएमएच्या लोकांनो वाटीभर पाण्यात बुडून मरा ‘ मदर टेरेसा यांच्याबद्दलही वादग्रस्त वक्तव्य

शेअर करा

योगगुरू रामदेव बाबा यांनी अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धतीवर टीका केल्यानंतर चांगलाच वाद उफाळून आला आहे. बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथीनंतर पुन्हा एकदा डॉक्टरांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मोठी खळबळ उडाली होती. यानंतर आता या वादामध्ये साध्वी प्राची यांनी उडी घेतली आहे. साध्वी प्राची यांनी आयएमएवर जोरदार टीका करतानाच मदर तेरेसा यांच्याबद्दल देखील वादग्रस्त विधान केलं आहे. साध्वी प्राची यांनी एका व्हिडीओतून आपली भूमिका मांडली आहे. “आयएमएच्या लोकांनो वाटीभर पाण्यात बुडून मरा, बाबा रामदेव यांनी कोट्यवधी लोकांना बरं केलंय” असा दावा केला आहे .

साध्वी प्राची पुढे म्हणाल्या, “आयएमएच्या माध्यमातून 1928 मध्ये एक एनजीओ तयार केली होती. भारतात मदर तेरेसा नावाची एक जादूगार होती, जी लोकांना स्पर्श करूनच बरं करायची. त्यांचा मृत्यूही रुग्णालयात झाला होता. बाबा रामदेव यांनी कोट्यवधी लोकांना बरं केलं आहे. आयएमएच्या लोकांनो लक्ष देऊन ऐका, वाटीभर पाण्यात बुडून मरा. लाज वाटू द्या. आयुर्वेदावर चिखलफेक करणाऱ्यांनो नीट ऐका, बाबा रामदेव देशासाठी खूप मोठं कार्य करत आहेत. ते कोट्यवधी लोकांना बरं करत आहेत” . आयुर्वेदावर आयएमएने कोणतीही टीका केलेली नाही किंवा बाबा रामदेव म्हणजे आयुर्वेद आहे का ? याचा तर्क मात्र साध्वी प्राची देऊ शकल्या नाहीत .

बाबा रामदेव यांना अटक करण्याची मागणी झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये, किसी का बाप भी अरेस्ट नही कर सकता, असे बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. यावर आता तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं नाव न घेता निशाणा साधला आहे. “स्वामी रामदेव यांना कुणाचा बापही अटक करू शकत नाही. रामकृष्ण यादव, आपण खरं बोललात. तुमचा भाऊ आणि बाप तर विरोधकांना अटक करण्यात गुंतले आहेत” असं म्हणत महुआ मोईत्रा यांनी रामदेव बाबांवर टीकास्त्र सोडलं आहे.

रामदेव बाबांनी स्वतः ऍलोपॅथीचे उपचार कधी घेतले घ्या जाणून ?

देशावर कोरोनाचं संकट घोंघावत असताना दुसरीकडे एलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद असा संघर्ष पाहायला मिळत आहे. योगगुरु रामदेव बाबा यांनी एलोपॅथीवर टिप्पणी करताना एलोपॅथी हे एक मुर्खपणाचं विज्ञान असल्याचं रामदेव बाबा म्हणाले होते. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात IMA ने रामदेव बाबा यांच्यावर कारवाईची मागणी केली. सर्व स्तरातून टीका होऊ लागल्यावर रामदेव बाबा यांनी आपलं विधानही मागे घेतलं.

रामदेव बाबा यांनी एलोपॅथीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं असलं तरी एकवेळ अशी होती की, रामदेव बाबा एलोपॅथीला शरण गेले होते. तसंच त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांनाही AIIMS मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. युपीए सरकारच्या काळात ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला होता. रामदेव बाबाही आण्णांच्या आंदोलनात सहभागी होत रामलीला मैदानावर उपोषणाला बसले होते.

दिवसभर उपोषण केल्यानंतर रामदेव बाबा रात्री झोपेत असतानाच तिथे पोलिसांचा मोठा फौजफाटा पोहोचला. त्यानंतर एकच खळबळ माजली. काही वेळातच रामदेव बाबा स्टेजवर आले आणि तिथून अचानक उडी मारत पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. रामदेव बाबा त्यावेळी चक्क सलवार कमीजमध्ये पळून गेले मात्र सलवार-कमीजमध्ये रामदेवबाबा नवी दिल्लीकडे निघाले असताना त्यांना पोलिसांनी पकडलं आणि देहरादूनला रवानगी केली. तिथेही रामदेव बाबा यांनी उपोषण सुरुच ठेवलं. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली. त्यामुळे त्यांना देहरादूनच्या जॉलीग्रँट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत आणि त्याच्यावर ऍलोपॅथीचेच उपचार करण्यात आले होते .

23 ऑगस्ट 2019 रोजी आचार्य बालकृष्ण यांची प्रकृती अचानक बिघडली. तेव्हा ते बेशुद्ध होऊन पडल्याचं सांगण्यात आलं. त्यांना आनन-फानन मध्ये पतंजली योगपीठाजवळील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा काही टेस्ट करुन त्यांची रवानगी AIIMS मध्ये करण्यात आली होती. त्यावेळी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगण्यात आलं होतं.

ऍलोपॅथीवर टीका करणारे रामदेवबाबा बनले ‘ माफीवीर ‘

रामदेव बाबा यांनी अॅलोपॅथीमुळे लाखो लोकांचे जीव गेल्याचं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर देशभरातून टीका झाली. इंडियन मेडिकल काऊंसिलने केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे कायदेशीर कारवाईची मागणी केली. यानंतर वाढता दबाव लक्षात घेऊन हर्षवर्धन यांनी देखील रामदेव बाबांना खरमरीत पत्र लिहिलं. त्यानंतर रामदेव बाबांनी माफी मागणं टाळत आपलं वक्तव्य मागे घेतल्याचं ट्विट केलं आणि हा वाद संपवण्याचं आवाहन केलं.

रामदेव बाबांनी आपल्या ट्विटसोबत आपली भूमिका मांडणारं एक पत्र जोडलं आहे. हे पत्र त्यांनी आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना पाठवलंय. यात त्यांनी लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर खेद असल्याचं म्हटलं. ते म्हणाले, “आमचा आधुनिक चिकित्सेला किंवा अॅलोपॅथीला विरोध नाही. माझं जे वक्तव्य कोट केलं जातंय ते कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्हॉट्सअॅप मेसेजमधील आहे. त्यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो.”

रामदेव बाबा काय म्हणाले होते ?

रामदेव बाबा या व्हिडीओत सुरुवातील एक मेसेज वाचून दाखवतात. यात ते वाचतात, “आश्चर्यकारक तमाशा आहे. अॅलोपॅथी मुर्खपणाचं आणि दिवाळखोर विज्ञान आहे. आधी रेमडेसिवीर फेल ठरलं, नंतर अँटिबायोटिक्स फेल झालं, नंतर स्टेरॉईड फेल झाले, प्लाझ्मा थेरपीवरही बंदी घालण्यात आली.” फॅबीफ्ल्यूचा उच्चार देखील नीटपणें रामदेवबाबा यांना करता आला नव्हता.

रामदेव बाबा बोलताना म्हणतात, “तापावर दिलं जाणारं फॅबीफ्ल्यू देखील निकामी ठरलंय. जेवढे औषधं देत आहेत त्या सर्वांचं हेच होत आहे. त्यामुळे लोक हा काय तमाशा सुरु आहे असं म्हणत आहेत. त्यांची तापावरील कोणतंही औषध काम करत नाहीये. कारण ते शरीराचं तापमान कमी करत आहेत. मात्र, ज्या विषाणूमुळे, बुरशीमुळे ताप येत आहे त्याचा यांच्याकडे इलाज नाही. तर मग हे कसं बरं करणार?”

पुढे बाबा म्हणाले, “म्हणूनच मी खूप मोठं विधान करतो आहे. काही लोक यावर वाद करतील. अॅलोपॅथीचं औषधं खाल्ल्याने लाखो लोकांचा मृत्यू झालाय. जितक्या लोकांचा मृत्यू रुग्णालयात न केल्यानं किंवा ऑक्सिजन न मिळाल्यानं झालाय त्यापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू ऑक्सिजन आणि अॅलोपॅथीची औषधं दिल्यानंतर झालाय. स्टेरॉईडमुळे मृत्यू झालाय. लाखो लोकांच्या मृत्यूचं कारण अॅलोपॅथी आहे.” रामदेव बाबांच्या आश्रेपार्ह वक्तव्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने (Indian Medical Association) त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली. तसेच ते लोकांची दिशाभूल करत असल्याचं सांगितलं.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नोटिशीत काय म्हणाले होते ?

सोशल मीडियामध्ये बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये ते अ‍ॅलोपॅथी उपाचर पद्धतीविरोधात बोलताना दिसत होते . सदर व्हिडिओची गंभीर देखल IMA नं घेतली असून याबाबत एक प्रेसनोट प्रसिद्ध केली . या व्हिडिओत बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथीबाबत केलेल्या आरोपांचा केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी स्विकार करावा आणि देशातील या आधुनिक चिकित्सापद्धतीचा भंग करावा किंवा बाबा रामदेव यांच्यावर महामारी रोग अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती .

प्रेसनोटमध्ये IMAनं म्हटलं की, “भारत सध्या कोविड-१९ महामारीचा सामना करत आहे. या बिकट काळात अ‍ॅलोपॅथी ही आधुनिक चिकित्सा पद्धती आणि भारत सरकार मिळून लोकांची जीव वाचवण्यात व्यक्त आहेत. या संघर्षात फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या १२०० अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांनी आपलं बलिदान दिलं आहे.”

व्हिडिओत बाबा रामदेव म्हणतात “अ‍ॅलोपॅथी एक मूर्ख आणि दिवाळ काढणारं विज्ञान आहे.” पण जेव्हा बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण हे आजारी पडतात तेव्हा ते देखील अॅलोपॅथीचीच औषधं घेतात. त्यामुळे बाबा रामदेव अ‍ॅलोपॅथीवर बिनबुडाचे आरोप करत आहेत आणि लोकांची दिशाभूल करत आहेत कारण आपल्या बेकायदा आणि मंजुरी नसलेली औषध त्यांना विकायची आहेत”

व्हायरल व्हिडिओमध्ये बाब रामदेव म्हणतात, “कोविड-१९ महामारीमुळे होत असलेल्या मृत्यूंमागे अ‍ॅलोपॅथीचं कारण सांगण्यात आलं आहे. अ‍ॅलोपॅथीची औषधं खाऊनच लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयांमध्ये न गेल्यानं आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळे झालेल्या मृत्यूंपेक्षा अधिक मृत्यू अ‍ॅलोपॅथीची औषधं खाऊन झाले आहेत”

बाबा रामदेव यांच्या अ‍ॅलोपॅथीविरोधातील या विधानामुळं सध्या कोविड संकटात रुग्णालयांमध्ये आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करणारे डॉक्टर्स आणि हेल्थवर्कर्समध्ये मोठा राग आहे. दिल्लीतील सफदरजंग येथील रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या असोसिएशनने बाबा रामदेव यांच्या या वक्तव्यावर आक्षेप नोंदवत त्यांच्यावर महामारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली . हर्षवर्धन यांच्याकडून कान पिळले गेल्यानंतर रामदेव यांनी लगेच माफी मागितली आहे.


शेअर करा