पायात विष झाल्याने पाय कापण्याची आली होती वेळ , रोहित पवारांनी घातले लक्ष अन ..

शेअर करा

कर्जत-जामखेडच्या नागरिकांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार रोहित पवार नेहमीच कार्यरत असल्याचे पहायला मिळालेले आहे अशीच एक घटना समोर आली असून रोहित पवार यांचे यासाठी कौतुक केले जात आहे . जामखेड येथील सतीश अप्पासाहेब माने या 30 वर्षीय युवकाला आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून तात्काळ वैद्यकीय सुविधा प्राप्त झाल्याने नवे आयुष्य मिळाले आहे.

काय आहे प्रकरण ?

सतीश अप्पासाहेब माने यांचा काही महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. अपघातावेळी सतीशच्या पायाला जबर दुखापत झाली असल्याने त्याच्या पायामध्ये रॉड बसवावा लागला. काही कालावधीनंतर जखम भरून येऊन बरी होणे अपेक्षित होते मात्र तसे झाले नाही त्यामुळे कुटुंबीयांनी पुढील उपचारासाठी सतीशला सुरुवातीला अहमदनगर व नंतर पुणे येथील रुग्ण्यालयात दाखल केले. मात्र वेगवेगळे वैद्यकीय उपचार करूनही जखम भरून न आल्याने पायामध्ये विष तयार झालेले समजले.

माने कुटुंबातील सदस्यांनी आमदार रोहित पवार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सतीशच्या उपचारासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. एक लाखापर्यंत उपचार खर्च डॉक्टरांनी सांगितला होता. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून सतीशला पुण्यातील नामांकित रुग्णालयात दाखल करून सर्व उपचार मोफत उपलब्ध करून देण्यात आले परंतु तेथे उपचार होऊनही सतीशच्या प्रकृतीत कुठलीही विशेष सुधारणा झाल्याचे दिसून आली नाही.

सतीशच्या प्रकृतीचा आमदार रोहित पवार यांनी स्वतः आढावा घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ल्याने सतीशला बारामती येथील भोईटे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि 24 जून रोजी सतीशवर डॉ. भंडारे यांनी स्किन ग्राफ्टींगची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली त्यामुळे सतीश यांचा पाय कापण्याची वेळ आली नाही. सतीश पूर्ण ठणठणीत बरा होऊन पूर्वीप्रमाणेच चालायला लागणार असून सतीशला आता आयुष्य जगण्यासाठी नवी उमेद मिळाली आहे.


शेअर करा