गोदुताई सोसायटीमधील सुविधांसाठी नागरिक एकवटले , विविध संघटना देखील आक्रमक

शेअर करा

सोलापूर शहरातील गोदुताई गृहनिर्माण संस्था अ, ब, क, येथील निवासी गेल्या १६ वर्षांपासून तेथे राहत आहेत परंतु त्यांना त्या भागामध्ये कोणतेही योग्य सोय सुविधा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी तेथील नागरिक करत आहेत. त्याकरीता प्रहार संघटना, आम आदमी पार्टी, काँग्रेस, एएमआयएम आणि आरएसएस असे सर्वपक्षीय व संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी मा.निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार ह्यांना निवेदन देण्यात आले आहे.

गेल्या १६ वर्षांपासून आज पर्यंत रेशन दुकान किंवा दवाखान्याची सोय या भागात झालेली नाही. सांडपाणीसाठी ड्रेनेजची व्यवस्था नसल्यामुळे सगळ्यांच्या घराबाहेर सांडपाणी जमा होऊन लोकांना त्रास सहन करावा लागत आहे तसेच सांडपाणी मुळे डासांचे प्रमाण खुप वाढले आहे आणि स्थानिकांना डेंगूला सामोरे जावे लागत आहे. घंटागाडी फक्त नावासाठी असून कचऱ्याचे निवारण होत नाही असे दिसून येते. रस्त्याची सोय नसल्यामुळे नागरिकांना खुप त्रास होत आहे. ५० ते ६० हजार लोकांना मतदार यादीत नोंदणीसाठी देखील त्रास होतो आणी अशा अनेक अडचणींना तेथील स्थानीक सामोरे जात आहेत.

तरी वरील विडी घरकुल निगडीत सर्व रास्त मागण्याची प्रतिपूर्ती करून तेथील नागरिकांच्या सोयीं विषयी उपाययोजना एक महिन्यात करण्यात यावी अन्यथा संबंधित सर्व नागरिकांना घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळेस देण्यात आला आहे. या वेळेस गोदुताई एकता विकास मंचचे वसीम देशमुख, प्रहार संघटनेचे मोहसीन शेख व हुसेन जहागीरदार, आम आदमी पार्टीचे मो. अस्लम शेख, प्राजक्त चांदणे, निहाल किरनळ्ळी व मंजूर खानापुरे,ए एम आय एम तर्फे रियाझ सय्यद, काँग्रेस तर्फे लक्ष्मण दसरी, आर एस एस तर्फे नागेश श्री व विडी घरकुल येथील बरेच नागरिक उपस्थित होते.


शेअर करा