.. म्हणून महिलेने पार केल्या ‘ सगळ्या ‘ मर्यादा , आली अखेर डीएनए टेस्टची वेळ

शेअर करा

आपण दिसायला सुंदर असावं असं प्रत्येकाला वाटत त्यासाठी लोक काही पैसे खर्च करून चेहऱ्याची काळजी घेतात. आपण सुंदर असलो तर आपली मुले देखील सुंदर होतील अशी देखील यामागे भावना असते, मात्र आफ्रिकन देश घाणा इथे एका महिलेनं जे केल्यावर कुणाचाही सहजासहजी विश्वास बसणार नाही. आपला पती दिसायला सुंदर नाही म्हणून या महिलेनं चक्क सुंदर मुले जन्माला यावीत म्हणून आपल्या प्रियकरासोबत संबध ठेवले अन चक्क तीन मुले देखील जन्माला घातली .

घाना या देशातील ही घटना असून एका महिलेचं एका मेहनती आणि प्रेम करणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न झालं. महिलेलाही आपल्या पतीसोबत आर्थिक स्वरूपाची काहीही अडचण नव्हती. मात्र पती तितकासा सुंदर नसल्याने या महिलेला आपली मुले जर पतीसारखी कुरूप झाली तर काय याची चिंता सतावू लागली . तिला आपल्या पतीच्या मुलांना जन्म द्यायचा नव्हता म्हणून सुरवातीला महिला पतीला न सांगताच गर्भनिरोधक गोळ्या घेत असे.

काही दिवस पतीला ती अशा प्रकारे बनवत राहिली मात्र मुलेच होईनात म्हणून जेव्हा ही गोष्ट थेट डॉक्टरांपर्यंत पोहोचली तेव्हा महिलेनं भयंकर शक्कल लढवली. डॉक्टरांनी पती आणि पत्नी दोघे देखील नॉर्मल असल्याचं सांगितल्यानं महिलेला आपली पोलखोल होण्याची भीती वाटू लागली. त्यामुळे तिनं मुलांना जन्म देण्यासाठी आपल्या एक्स बॉयफ्रेंडसोबत संबंध ठेवले आणि पतीसोबतही ती पत्नीप्रमाणेच रहायची. ही गोष्ट मात्र तिच्या पतीच्या लक्षात आली नाही आणि हळू हळू त्यांना तीन मुले देखील जन्माला आली.

गेली अनेक वर्षे हा प्रकार असाच सुरु होता. पतीला याबद्दल काही कल्पनाच नव्हती मात्र अचानक एके दिवशी त्याला अमेरिकन व्हिसाची लॉटरी लागली मात्र या लॉटरीसाठी कुटुंबीयांची डीएनए टेस्ट गरजेची होती. अद्याप या टेस्टचा रिपोर्ट समोर आलेला नाही. मात्र महिलेला सत्य माहिती आहे आणि याचा परिणामही तिला स्पष्ट दिसत असल्याने अखेर ही गोष्ट जगजाहीर झाली.


शेअर करा