.. अन नराधम चक्क ‘ सरकारी नोकर ‘ निघाला.. नीचपणाच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या

शेअर करा

महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस येत असताना आता आणखी एक घटना वर्धा येथे उघडकीस आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने आपल्या स्वतःच्या मुलीवर चार वर्षापासून अत्याचार केल्याची ही घटना आहे. तब्बल चार वर्षापासून पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या या नराधम पित्याच्या विरोधात सेवाग्राम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक करून त्यांची रवानगी कारागृहात केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित मुलीचा नराधम बाप हा सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीवर आहे आणि सर्व कुटुंबीय यवतमाळ येथे राहायचे. बापाची नोकरी वर्ध्याला असल्याने तो अपडाऊन करायचा. 10 जुलै 2017 मध्ये पीडित मुलगी घरी असताना त्याने तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीच्या मावशीने ही घटना पीडित महिलेच्या आईला सांगितली मात्र आईने देखील त्याकडे दुर्लक्ष केले.

आपली बायको आपल्या अनैतिक कृत्याला पाठीशी घालते हे लक्षात आल्यानंतर या नराधमाच्या विकृतीत आणखीन भर पडली आणि आपल्याला कुणी काही बोलत नाही यानंतर त्याने पुन्हा आपल्या मुलीचा लैंगिक छळ सुरू ठेवला. वर्षभरानंतर पीडित मुलगी कुटुंबासह सेवाग्राम येथे राहण्यासाठी आली अन तिथे देखील तिच्या वडिलांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आपले म्हणणे कोणीच ऐकत नाही हे लक्षात आल्यानंतर पीडित मुलीने सदर घटना आपल्या मैत्रिणीला सांगितली आणि आणि एका एनजीओने याची दखल घेत सेवाग्राम पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. आरोपी नराधम सध्या गजाआड असून त्याला कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिक करत आहेत.


शेअर करा