पुणे हादरले.. ‘ म्हणून ‘ प्रदीप स्वीटच्या समोर दुचाकीला लावली काडी

शेअर करा

कोरोनामुळे अनेक उद्योग धंद्यांवर परिणाम झाला असल्याने कामगारांच्या पगाराचेही वांदे झाले होते. कोरोनातून सावरल्यानंतर आता काही प्रमाणात उद्योग धंदे सुरू झाले आहे पण अजूनही मालकांकडून पैसे काही निघत नाही. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये एका कामगाराने पगार न दिल्यामुळे मालकाची दुचाकीच भर रस्त्यावर पेटवून दिली. या घटनेचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत असून या प्रकाराची जोरदार चर्चा सुरु आहे.

उपलब्ध वृत्तानुसार, पिंपरी-चिंचवड शहरात ही घटना घडली असून अंकित शिशुपाल यादव असं दुचाकी पेटवून देणाऱ्या कामगाराचं नाव आहे. अंकित यादव हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून तो मांजरी येथे गणेश उंदरे पाटील यांच्याकडे कामाला होता मात्र गणेश पाटील यांनी अंकित यादव याला पगार दिला नाही त्यामुळे त्यांच्यात वादावादी झाली. महिनाभर काम केल्यानंतरही पगार न मिळाल्यामुळे अंकितने मालकाची दुचाकीच पळवून आणली त्यानंतर गाडी चिंचवड येथील प्रदीप स्वीटच्या समोर पेटवून दिली .

भर रस्त्यावर दुचाकी पेटवण्याची घटना शहरात वाऱ्यासारखी पसरली. स्थानिकांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेऊन दुचाकीला लागलेली आग विझवली. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अंकित यादव याला अटक केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये यापूर्वी देखील अशीच एक घटना घडली होती. 18 ऑगस्टला एका चालकाला कामावरून काढले होते त्यामुळे त्याने मालकाच्या 22 लाखांच्या गाड्या जाळल्या होत्या.


शेअर करा