कोल्हापूर हादरले.. चिमुकल्याच्या मृतदेहाशेजारी ‘ अशा ‘ वस्तू आढळल्या की..

शेअर करा

कोल्हापूरनजीक एक धक्कादायक घटना समोर आली असून सात वर्षांच्या बालकाची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे. चिमुकल्याच्या मृतदेहाजवळ गुलाल आणि कुंकू आढळल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्वत:ला मूल होत नाही म्हणून मित्राच्या मुलाचे अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना ऑगस्ट महिन्यात कोल्हापुरातच उघडकीस आली होती त्यानंतर हा प्रकार समोर आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे .

काय आहे प्रकरण ?

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील कापशी गावात राहणारा चिमुरडा बेपत्ता झाला होता. दोन दिवसांपासून चिमुकला घरातून गायब होता. त्यामुळे पालकांनी त्याच्या अपहरणाची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. आज (मंगळवारी) सकाळी सहा वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह त्याच्याच घराच्या पाठीमागे सापडला.

सात वर्षीय बालकाचा निर्घृण खून करण्यात आला असून मयत बालकाच्या अंगावर गुलाल, हळदी- कुंकू टाकण्यात आलं होतं. अमावस्याच्या पूर्वसंध्येलाच हा प्रकार समोर आला असल्याने हा नरबळीचा प्रकार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी मात्र याबाबत कोणतीच अधिकृत स्पष्टता दिलेली नाही. दरम्यान हे कृत्य करणाऱ्यांना कठोरात कठोर शासन करावे अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. शाहूवाडी पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके पाठवली होती मात्र दुर्दैवाने या बालकाचा मृतदेहच हाती आला.


शेअर करा