‘ शेतकऱ्यांवर गाडी चढवली ‘ , शेवगाव काँग्रेसची केंद्र सरकार विरोधात निदर्शने

शेअर करा

शेवगाव प्रतिनिधी : गांधी जयंतीच्या आठवणी ताज्या असताना उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी येथे अहिंसेच्या मार्गाला काळीमा फासणारी घटना समोर आली होती . लखीमपुर खेरी येथे शेतकरी अहिंसेच्या मार्गाने काळे झेंडे दाखवत असताना मंत्र्यांचा मुलगा चालवत असलेल्या गाडीने शेतकऱ्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये चार शेतकर्‍यांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक शेतकरी गंभीर जखमी झाले .

उत्तर प्रदेश सरकारचा निषेध करण्यासाठी शेवगाव तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकार व उत्तर प्रदेशातील भाजप सरकार बरखास्त करण्यात यावे अशी मागणी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली. त्याचबरोबर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी “शेतकऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या स्वयंसेवकांकडून काठीने मारुन जशास तसे उत्तर देण्यात यावे” असे वक्तव्य केले होते . या वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रपती महोदयांनी अशा बेताल मुख्यमंत्र्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.

शेवगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. अमोल फडके यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात माजी सभापती प्रकाश बाप्पू भोसले, शहराध्यक्ष किशोर कापरे, युवक अध्यक्ष बब्रु वडघने, सेवादलाचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब शिंदे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे अध्यक्ष बब्बू भाई शेख, किसान सेलचे सुधिर बाबर, पत्रकार निजाम भाई पटेल, मुंगी ग्रामपंचायत सरपंच श्री. दसपुते, गणेश शिरसागर, मुंगी गावचे ग्रामपंचायत सदस्य श्री. शेख, विद्यार्थी काँग्रेसचे महेश काटे, सचिन काळे, नामदेव कारंडे, योगेश वडघने, सोपान घोरतळे, योगेश भोसले, राजेंद्र गिरगे, एस सी अध्यक्ष कचरू मगर, विलास निकाळजे, देविदास मगर, जगन्नाथ भारस्कर, बाजीराव अंगरक, अमोल दहिफळे, सुरेश निकाळजे आदी सहभागी होते.


शेअर करा