नगरमध्ये खळबळ..अल्पवयीन मुलाला आवाज देऊन लष्करातील अधिकाऱ्याने जवळ बोलावले अन..

शेअर करा

नगर शहरातील सावेडी उपनगरात अल्पवयीन मुलावर अत्याचार करणारा नराधम हा चक्क लष्करातील अधिकारी निघाल्याने शहरात खळबळ उडाली आहे . पोलिसांनी त्याला गजाआड केले असून सुखदेव रामा गणेशा रामा ( वय 45 राहणार नागोरी राजस्थान ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला २० ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सावेडी उपनगरातील एका गॅरेजवर 13 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी लष्करातील काही जवान त्यांच्या वाहनांची दुरुस्ती करत होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत ज्युनियर ऑफिसर या पदावर कार्यरत असलेला सुखदेव रामा हा तिथे उपस्थित होता. त्याच वेळी रस्त्यावरून तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगा जात असताना सुखदेव रामा याने आवाज देऊन त्याला आपल्याजवळ बोलावले आणि त्यानंतर या मुलाला झाडीत ओढत नेत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला.

हा प्रकार जर कुणाला सांगशील तर तुला जीवे मारू, अशी धमकी देखील त्याने दिली मात्र अल्पवयीन मुलाने त्याच्या धमकीला भीक न घालता आपल्या घरी झालेला प्रकार कथन केला व त्यानंतर तोफखाना पोलिस ठाण्यात या प्रकाराबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. तोफखाना पोलीस स्थानकाच्या निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जेसी मुजावर यांनी या गुन्ह्याचा तपास करत आरोपीला जेरबंद केले.

अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच निरीक्षक ज्योती गडकरी व सहाय्यक निरीक्षक मुजावर यांनी तात्काळ या प्रकरणात लक्ष घालत घटनास्थळाची पूर्णतः तपासणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज शोधण्यात आले आणि त्यानंतर अत्याचार करणारा आरोपी हा लष्करातील असल्याची बाब पुढे आली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या धक्कादायक प्रकाराची माहिती दिली आणि लष्करी अधिकाऱ्यांनी देखील तात्काळ या प्रकरणाची दखल घेत त्यादिवशी सुखदेवरामा याच्यासोबत असलेल्या इतर जवानांना देखील बोलावण्यात आले आणि आणि आरोपी स्पष्ट झाल्यानंतर त्याला जेरबंद करण्यात आले.


शेअर करा